महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊन इफेक्ट : 'ऑनलाइन'मुळे डोळ्यांचा त्रास; अँटी रिफ्लेक्शन कोटिंग लेन्सच्या विक्रीत वाढ - online education pune

गॅझेट्सच्या अतिवापरामुळे डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, नवीन चष्मा लागणे, तसेच त्या चष्म्याच्या नंबरमध्ये वाढ होणे, असे अनेक त्रासांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून नागरिकांकडून ज्या लेन्समुळे स्क्रिनचा त्रास होत नाही अशा लेन्स वापरणे पसंत केले. या लेन्सच्या वापरात 20 ते 25 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर ऑनलाइन शिक्षणामुळे 15 ते 20 टक्के लहानमुलांना नवीन चष्मे लागले असल्याचे दिसून आले आहे.

anti reflection coating lense sales incresed
अँटी रिफ्लेक्शन कोटिंग लेन्सच्या विक्रीत वाढ

By

Published : Jul 30, 2020, 10:55 AM IST

Updated : Jul 30, 2020, 1:29 PM IST

पुणे - कोरोनाकाळात टीव्ही, मोबाईल, लॅपटॉपच्या वाढलेल्या वापरामुळे 'अँटी रिफ्लेक्शन कोटिंग लेन्स'मध्ये वापरात 20 ते 25 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर ऑनलाइन शिक्षणामुळे 15 ते 20 टक्के लहानमुलांना नवीन चष्मे लागले असल्याचे दिसून आले आहे.

लॉकडाऊन इफेक्ट : 'ऑनलाइन'मुळे डोळ्यांचा त्रास; अँटी रिफ्लेक्शन कोटिंग लेन्सच्या विक्रीत वाढ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. या कालावधीत अनेक कंपन्यांनी त्यांनी कामकाज वर्क फ्रॉम होम स्वरुपात सुरू केले. तर विद्यार्थ्यांसाठीही ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय सुरू करण्यात आला. यामुळे या कालावधीत टीव्ही, मोबाईल, लॅपटॉपच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, याच स्क्रिनचा परिणाम सध्या ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांना होऊ लागला आहे.

या गॅझेट्सच्या अतिवापरामुळे डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, नवीन चष्मा लागणे, तसेच त्या चष्म्याच्या नंबरमध्ये वाढ होणे, असे अनेक त्रासांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून नागरिकांकडून ज्या लेन्समुळे स्क्रिनचा त्रास होत नाही अशा लेन्स वापरणे पसंत केले. या लेन्सच्या वापरात 20 ते 25 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर ऑनलाइन शिक्षणामुळे 15 ते 20 टक्के लहानमुलांना नवीन चष्मे लागले असल्याचे दिसून आले आहे.

या गॅझेट्सचा अतिवापरही धोकादायक आहे. यामुळे डोळ्यांबरोबर मेंदूलाही याचा त्रास होतो. लहान मुलांच्या बाबतीत तर या वयात हा त्रास होणे धोकादायक आहे. यामुळे लोकांनी स्क्रिन टाईम व्यतिरिक्त याचा जास्त वापर करू नये. आत्ता काही काळ जरी आपले स्क्रिन वापर वाढला असला तरी यावर काही उपाययोजना करण्यात यायला हवी. कामा व्यतिरिक्त याचा जास्त वापर करू नये. सध्या आमच्या इथे डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, अशा तक्रारींमध्ये वाढ झाली आहे, अशी माहिती नेत्रतज्ञ डॉ. तेजस्विनी वल्हवणकर यांनी दिली.

हेही वाचा -कांगारु, माकडे, कासव अन् पोपटांची तस्करांच्या तावडीतून सुटका; परदेशातून भारतात तस्करी

पुणे शहरात शहराच्या मध्यवर्ती भागात अप्पा बळवंत चौकात चष्म्याचे मोठे मार्केट आहे. सर्वसामान्य दिवसात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नवीन चष्मा, रिपेरिंगसाठी शहर व जिल्ह्याबाहेर ग्राहक येत असत. मात्र, आज या ग्राहकांमध्ये 40 ते 50 टक्के घट झाली आहे. तरी डोळ्यांना त्रास न होणाऱ्या सर्व प्रकारच्या लेन्सच्या विक्रीत 20 ते 25 टक्क्याने वाढ झाली आहे.

दरवर्षी या लेन्समध्ये 10 ते 15 टक्के वाढ होत होती. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्वत्र ऑनलाइन सुरू असल्याने या लेन्सच्या विक्रीत ती वाढ आज 20 ते 25 टक्क्यांपर्यंत झाली आहे, अशी माहिती न्यू साई चष्मा घरचे जयप्रकाश जमादार यांनी दिली. तर लॉकडाऊनचा फटका जसा सर्वच व्यवसायावर बसला आहे, तसाच फटका चष्मा व्यावसायिकांवरही झाला आहे. जे ग्राहक पहिले येत होते ते आता येत नाही. साधारणत: 40 ते 50 टक्के ग्राहक कमी झाले आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे 'अँटी रिफ्लेक्शन कोटिंग लेन्स'मध्ये वाढ झाली आहे. तरी रोज जे 100 ते 120 ग्राहक येत होते ते आज 30 ते 40वर आले आहे, अशी खंतही काही दुकानदारांनी व्यक्त केली.

Last Updated : Jul 30, 2020, 1:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details