महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीत मद्यविक्रीला सुरुवात; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त - Sale of liquor started in Baramati

शासनाला सर्वाधिक महसूल मिळत असणार्‍या दारू निर्मिती व दारूविक्री दुकानांना शासनाने मद्य विक्रीस परवानगी दिली आहे. त्यानुसार बारामतीत नियमांचे पालन करत पोलीस बंदोबस्तात दुकाने खुली करण्यात आली.

बारामतीत मद्यविक्रीला सुरुवात; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
बारामतीत मद्यविक्रीला सुरुवात; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

By

Published : May 6, 2020, 4:08 PM IST

पुणे - टाळेबंदीत शासनाने दारुविक्री करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. ही संधी हेरून दीड महिन्यांपासून दारुसाठी त्रासलेल्या बारामतीतील तळीरामांनी सकाळपासूनच दुकानासमोर लांब रांगा लावल्या होत्या. भर उन्हात ४० अंश सेल्सियस तापमानात दारू खरेदीसाठी तळीराम उभे ठाकल्याचे दिसून आले.

शासनाला सर्वाधिक महसूल मिळत असणार्‍या दारू निर्मिती व दारूविक्री दुकानांना शासनाने मद्य विक्रीस परवानगी दिली आहे. त्यानुसार बारामतीत नियमांचे पालन करत पोलीस बंदोबस्तात दुकाने खुली करण्यात आली. दारू खरेदी करणाऱ्या प्रत्येकाची थर्मल मशीनद्वारे चाचणी व हातावर सॅनिटायझरचा वापर करून मद्य विक्री केली जात आहे. सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत उभा असलेल्या पहिल्या ग्राहकाला पुष्पहार घालून बारामतीत दारू विक्रीस सुरुवात करण्यात आली.

बारामतीत मद्यविक्रीला सुरुवात; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

टाळेबंदीमुळे गेल्या दीड महिन्यापासून दारू विक्रीची दुकाने बंद होती. बंददरम्यान बारामतीत ठिकठिकाणी चढ्या भावाने छुप्या पद्धतीने अवैधरित्या दारू विक्री होत होती. मात्र, आता शासनाने दारू दुकानांना दारूविक्रीस परवानगी दिल्याने योग्य त्या किंमतीत दारू मिळत असल्याने तळीरामांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. बारामती शहरातील भीगवन चौक, इंदापूर चौक, कसबा येथील सहा दुकाने खुली झाली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details