पुणे - संत ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढीवारी पालखी सोहळा सुरू होत आहे. माऊलींच्या पालखीतील चांदीचे आसन, पूजेचे साहित्य नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ करण्याचे काम कारागिरांकडून सुरू आहे. पूजेच्या साहित्यामध्ये असणारी प्रत्येक वस्तू अगदी नव्याने चकाकी करून तयार करण्यात आली आहे.
आषाढी वारी : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पूजेच्या साहित्याची तयारी पूर्ण - worship
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढीवारी पालखीची तयारी जोरात सुरू आहे. पालखीतील चांदीचे आसन, पूजेचे साहित्य नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ करण्याचे काम कारागिरांकडून सुरू आहे. या साहित्यांच्या देखभालीसाठी 3 सेवकांची नियुक्ती करण्यात आली असून सेवकांकडून या साहित्याचे पूजन केले जाणार आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करत असताना मुक्कामाच्या ठिकाणी माऊलींच्या पादुका वारकरी व भाविकांच्या दर्शनासाठी ठेवल्या जातात. या पादुका ठेवण्यासाठी लागणारे सिंहासन, पूजेचे साहित्य अशा सर्व चांदीच्या वस्तू कारागिरांकडून तयार करण्यात आल्या आहेत.
वारी काळात माऊलींच्या पुजेच्या साहित्याचे पावित्र्य जपण्याचे काम व साहित्यांच्या देखभालीसाठी 3 सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेवकांकडून या साहित्याचे पूजनही केले जाणार आहे.