आळंदी (पुणे)- यंदा आषाढी वारीवर कोरोनाचे संकट आहे. आज दुपारी दीड वाजता अलंकापुरीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पंढरीच्या दिशेने प्रस्थान झाल्या. यासाठी एसटी महामंडळाची विठाई बस तयार करण्यात आली होती. २० वारकऱ्यांच्या उपस्थित पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. आळंदीकरांनी हार फुलांचा वर्षाव करत माऊलींना मार्गस्थ केले.
अलंकापुरीमध्ये आषाढी वारी सोहळा सुरू असताना कोरोना महामारीचे मोठे संकट उभे आहे. या कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी देवस्थान व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मंदिर परिसर व वारी मार्गावर विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. भाविकांनी वारी मार्गावर गर्दी करू नये असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
आषाढी वारी: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे अलंकापुरीतून प्रस्थान... - संत ज्ञानेश्वर माऊली पालखी बातमी
अलंकापुरीमध्ये आषाढी वारी सोहळा सुरू असताना कोरोना महामारीचे मोठे संकट उभे आहे. या कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी देवस्थान व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मंदिर परिसर व वारी मार्गावर विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अलंकापुरीतून प्रस्थान...
दरम्यान, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आजोळ घरी म्हणजेच देऊळवाड्यात चौदा दिवसांचा मुक्कामाला होत्या. आषाढी वारीच्या परंपरेनुसार चौदा दिवस देऊळवाड्यात हरिनामाचा गजर करत टाळ-मृदंगाच्या नादात भजन कीर्तनाचा सोहळा घेण्यात आला.