महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना व्हायरस : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध साई मंदिर २५ वर्षानंतर प्रथमच बंद - कोरोना

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे ११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणे आणि धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत.

sai temple in pimpri chinchwad city
साई मंदिर पिंपरी चिंचवड

By

Published : Mar 19, 2020, 4:26 PM IST

Updated : Mar 19, 2020, 5:22 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचे संकट अधिक गडद होत चालले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध साई मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय ट्रस्टी शिवकुमार निलगे यांनी घेतला आहे. गेल्या २५ वर्षानंतर पहिल्यांदाच हे मंदिर बंद ठेवण्याची वेळ मंदिर प्रशासनावर आली आहे. शहरात कोरोनाचे ११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणे आणि धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध साई मंदिर २५ वर्षानंतर प्रथमच बंद

हेही वाचा....#CORONA : 'हे संकट सर्वधर्मीयांवर'

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध साई मंदिर हे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. दररोज या ठिकाणी हजारो साई भक्त दर्शन घेत असतात. यामुळे साई मंदिरात गर्दी होते. त्यामुळेच येथील मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या २५ वर्षात पहिल्यांदाच हे मंदिर बंद राहणार आहे. पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे येथे कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आत्तापर्यंत १९ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि भोसरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

'साई भक्तांनी घराबाहेर पडू नये. गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे' असे यावेळी शिवकुमार निलगे यांनी सांगितले. तसेच परिस्थिती निवळल्यावर पुन्हा साई मंदिर भक्तांसाठी सुरू असेल. या दरम्यान, मंदिरात दररोज केली जाणारी साईंची पूजा सुरु असणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Last Updated : Mar 19, 2020, 5:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details