पुणे - शहरात औषधांची घाऊक खरेदी-विक्री येत्या शुक्रवारपासून तीन दिवस बंद राहणार आहे. बाजारपेठेतील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या बाजारपेठेत जवळपास चारशे घाऊक दुकाने असून शहरातील पाच हजार औषध दुकानांना औषध पुरविले जात आहेत. या भागात गेली अनेक वर्षे ही दुकाने चालू आहेत. लॉकडाऊनच्या या काळात अत्यावश्यक सेवा म्हणून मेडिकलला सूट आहे. त्यामुळे येथे कायमच गर्दी होत होती. लॉकडाऊनच्या या काळात येथे कधीच सोशल डिस्टन्सिंग किंवा इतर नियम पाळले गेले नाही. याबाबत स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला वेळोवेळी तक्रारही केली होती. मात्र, याकडे पोलीस यंत्रणेसह सर्वांनीच दुर्लक्ष केले. आता कोरोना रुग्ण सापडल्याने येथील स्थानिक युवकांनी एकत्र येत येथे निर्जंतुकीकरण सुरू करून दुकाने सक्तीने बंद करायला लावली आहेत.
सदाशिव पेठेतील घाऊक बाजारपेठ उद्यापासून तीन दिवस बंद - wholesale market closed news
कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी सामाजिक भान म्हणून घाऊक बाजारपेठ पुढील तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यादरम्यान दुकानांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सचिव अनिल बोरकर यांनी दिली.
कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी सामाजिक भान म्हणून घाऊक बाजारपेठ पुढील तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यादरम्यान दुकानांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सचिव अनिल बोरकर यांनी दिली. दुकानातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी क्रमप्राप्त आहे. त्यानंतरच सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करून येत्या सोमवारपासून औषधांची घाऊक बाज़ारपेठ नियमित पूर्ववत सुरू होईल. मात्र, असे असताना गेली 50 दिवस लॉकडाऊनचे पालन करत आम्ही घरातच बसलोय. सोशल डिस्टन्सिंगचा वापर न करून गर्दी करून येथे कोरोनाचा शिरकाव झाल्याने येथील स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.