पुणे- सारथी संस्थेमध्ये सुरू असलेला प्रकार, संस्थेसंदर्भात काढले जाणारे वेगवेगळे परिपत्रक आणि संस्थेच्या स्वायत्ततेला धोका निर्माण केला जातो आहे. हे सगळे का घडते काहीही कळत नाही, असे वक्तव्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहिलेले सदानंद मोरे यांनी केले आहे.
"सारथी संस्थेत घडत असलेल्या प्रकाराबाबत संभ्रम"
संस्था सुरू झाल्यापासूनच अवघ्या आठ नऊ महिन्यातच संस्थेच्या माध्यमातून आम्ही जोरदार कामाला सुरुवात केली होती. संस्थेचे काम योग्य पद्धतीने सुरू होते. मात्र, अचानक गैरप्रकाराच्या आरोपामुळे एक महिन्यापासून संस्थेबाबत काय घडत आहे.
संस्था सुरू झाल्यापासूनच अवघ्या आठ नऊ महिन्यातच संस्थेच्या माध्यमातून आम्ही जोरदार कामाला सुरुवात केली होती. संस्थेचे काम योग्य पद्धतीने सुरू होते. मात्र, अचानक गैरप्रकाराच्या आरोपामुळे एक महिन्यापासून संस्थेबाबत काय घडत आहे. हे कोण करत आहे, काही कळत नाही, असे सदानंद मोरे म्हणाले.
युती सरकारच्या काळात संस्थेची स्थापना झाली. त्यावेळी सदानंद मोरे यांची संस्थापक अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मात्र, सरकार बदलल्यानंतर मोरे यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मात्र, संचालक मंडळात ते आहेत. दरम्यान, आता यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने सारथीच्या संचालक मंडळाशी चर्चा करावी, असे मत ईटीव्ही भारताशी बोलताना सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.