पुणे : शिव भक्तांना असे अडवण्यात का आले ? या ठिकाणी सर्व शिव भक्तांना दर्शन घेण्याचा अधिकार आहे. असा दुजाभाव येथे करू नका असे म्हणत संभाजी राजेंनी यावेळी झालेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी शिवभक्तांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. त्या दरम्यान, मुख्य कार्यक्रम काहीवेळ थांबवण्यात आला होता. यावेळी प्रशासनाच्या या कारभारावर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे हे देखील आक्रमक झाले होते.
व्हीआयपी पास कोणाच्या म्हणण्यानुसार दिले जातात ? : यावेळी माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना काही मागण्या केल्या आहेत. यात त्यांनी म्हटले आहे की, शासकीय कार्यक्रम जो होते त्या कार्यक्रमाला सामान्य शिवभक्तांना अडवल जाते. प्रशासन व्हीआयपी पास कोणकोणत्या लोकांना देत असत. हे व्हीआयपी कोणाच्या म्हणण्यानुसार दिले जाते ? सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय आणि व्हीआयपी लोकांना एक न्याय दिला जातो हे चुकीचे आहे. तसेच, शासकीय कार्यक्रमाला जेव्हा मंत्री हेलिपॅडने येतात तेव्हा खूप वेळ शिवभक्तांना थांबवले जाते. हे देखील बंद केले पाहिजे असही संभाजीराजे म्हणाले आहेत.
शक्ती आणि युक्तीच्या आधारे स्वराज्याची निर्मिती : शक्ती आणि युक्ती ही दोन शस्त्रे महाराजांच्या रणनितीचा भाग होती. त्यातून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांनी वयाच्या बाराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, प्रजेचे कल्याण व्हावे यासाठी प्रयत्न केले. रयतेवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. रयतेच्या रक्षणासाठी, हितासाठी कधी त्यांनी तडजोड केली नाही. दूरदृष्टीने गडकोट बांधले. ते कुशल प्रशासक, संघटक होते. त्यांनी शेती, सिंचन, शिक्षण, भाषा, महसूली, शासन, प्रशासनाच्या अनेक योजना आखल्या. समाजातील प्रत्येक घटकाची काळजी घेतली. त्यांच्या पराक्रमापुढे परकियांच्या माना झुकल्या. पेशावर ते तंजावरपर्यंत छत्रपतींचा भगवा डौलाने फडकला, असा गौरवोद्गार शिंदे यांनी व्यक्त केला.