माहिती देताना रुपाली चाकणकर पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. यावर आता खुद्द रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की ज्या लोकांनी तुम्हाला सांगितले की, मी दुसऱ्या पक्षातून जाण्यासाठी इच्छुक आहे, त्यांची आणि माझी एकदा मला भेट घालून द्या. कारण मला या गोष्टी तुमच्याकडूनच समजतात. शरद पवार यांनी मला राज्य महिला आयोगावर काम करण्याची संधी दिली. तसेच सर्वसामान्य कुटुंबाच्या महिलेला काम करण्याची संधी दिली.
पक्षाकडे उमेदवारी मागितली :आगामी 2024 सालच्या निवडणुकीबाबत रुपाली चाकणकर म्हणाल्या की, मी खडकवासला मतदार संघात आधीच उमेदवारी मागितली आहे. आता मी देखील इच्छुक आहे. राष्ट्रवादीच्या या संघटनेच काम मी सुरू केले आहे. तसेच मी अनेक पदावर काम केले आहे. आता येणाऱ्या 2024 साली खडकवासला मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनच मी उमेदवारी मागणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
हिरकणी कक्ष उभारा: यावेळी चाकणकर म्हणाल्या की, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्ष असावा. तसेच शासकीय कार्यालयात ते असलेच पाहिजे ही कायद्यामध्ये तरतूद आहे. असे असूनसुद्धा हिरकणी कक्ष कार्यरत होताना दिसत नाही. दुर्दैवाने पुणे महानगरपालिका साडेचारशे पाचशे महिला कर्मचारी, अधिकारी या ठिकाणी आहेत. इतकी मोठी यंत्रणा असताना सुद्धा २०१६ ला उद्घाटन झालेल्या हिरकणी कक्ष सात वर्ष बंद अवस्थेत होता. म्हणून गेल्या चार दिवसांपूर्वी कक्षाला मी सरप्राईज करणार अशा पद्धतीचे पत्र दिल्यानंतर, तो एका दिवसामध्ये हिरकणी कक्ष उभा केला गेला. आज त्याची पाहणी करण्यासाठी मी आले होते. आज जो हिरकणी कक्ष तयार केला तो अतिशय चांगला पद्धतीचा आहे.
बैठकीमध्ये सूचना दिल्या : दुर्दैवाने रजिस्टर चेक केल्यानंतर लक्षात आले की, सात वर्षांमध्ये त्यामध्ये एकाही महिलेची हिरकणी कक्षाच्या वापर केल्याची नोंद झाली नाही. याचा अर्थ तो हिरकणी कक्षा म्हणून वापरला गेलाच नाही. तो विश्रांतीगृह म्हणून वापरला गेला. महिला आयोगाच्या वतीने आजच्या बैठकीमध्ये सूचना देण्यात आलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये या महानगरपालिकेमधला हिरकणी कक्ष हा हिरकणी कक्ष म्हणूनच वापरला जाईल, कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीसाठी त्याचा वापर होणार नाही. अशा पद्धतीचा वापर आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
हेही वाचा -
- Missing Girls Statistics Pune: धक्कादायक! पुण्यात बेपत्ता मुलींच्या आणि बलात्काराच्या घटनेत वाढ
- Rupali Chakankar Demand: हरवलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी 'महा महिला आयोगा'ची समिती स्थापन करण्याची मागणी
- Rupali Chakankar : सुषमा अंधारे यांच्याबाबतचा कोणताही अहवाल महिला आयोगाकडे आला नाही - रुपाली चाकणकर