महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Tata Mumbai Marathon : मॅरेथॉनमध्ये धावण्याची जिद्दच भारी... गुडघा दुखत असतानाही हाफ मॅरेथॉन धावतोय सार्थक मलानी

करोनाच्या महामारीमुळे दोन वर्षांनी पार पडत असलेल्या १८ व्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये धावपटूंचा उत्साह अचंबीत करणारा आहे. यात सार्थक मलानी याने गुडघा दुखत असतांनाही हाल्फ मॅरेथॉन यामध्ये सहभाग घेतला आहे. हौशी धावपटूंशिवाय व्यावसायिक व इतर सहा गटांमध्ये एकूण ५५ हजाराहून अधिक धावपटू सहभागी झाले आहेत.

Tata Mumbai Marathon
सार्थक मलानी

By

Published : Jan 15, 2023, 10:18 AM IST

सार्थक मलानी

मुंबई : अवघी मुंबापुरी 'मुंबई मॅरेथॉन'साठी आज दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर उतरली असल्याचे पहायला मिळत आहे. नवचैतन्याने बहरलेल्या या मुंबापुरीला नवा वेग मिळाला आहे. असे आता म्हणता येते. जगभरातील धावपटूंचे आकर्षण असलेल्या 'मुंबई मॅरेथॉन'चे यंदा १८वे वर्ष आहे. यात अनोखे धावपटू दिसतात. सार्थक मलानी याच्या गुडघ्याला थोडी दुखापत असताना तो धावत आहे. त्याच्या धावण्याच्या हिमतीने नक्कीच इतरांना प्रेरणा मिळत आहे.




शारीरात ऊर्जा निर्माण : धावणे हे वैज्ञानिक दृष्ट्या शारीरात ऊर्जा निर्माण करणारे असते. मनाला प्रेरणा देणारे देखील असते. मॅरेथॉनमध्ये ५५ हजारांहून अधिक धावपटू सहभागी झाले आहेत. पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन, दहा किलोमीटर धाव, ड्रीम रन, सीनिअर सिटीझन्स रन आणि चॅम्पियन विथ डिसॅबिलिटी रन आदी विभागांमध्ये हजारो धावपटू ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दक्षिण मुंबईतील विविध महत्त्वपूर्ण इमारतींच्या सहवासात धावत आहेत. पूर्ण मॅरेथॉनचा मार्ग शहराच्या मध्यभागातून जाईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून तो सुरू होईल, तर अर्ध मॅरेथॉन ही माहीम रेती बंदरहून सुरू होत आहे.



हर दिल मुंबई : आशियातील प्रतिष्ठित अशा मुंबई मॅरेथॉनचे यंदा 'हर दिल मुंबई' असे ब्रीद वाक्य आहे. आपल्या नृत्यकौशल्य आणि अभिनयासह फिटनेससाठी आग्रही असलेला टायगर श्रॉफ यंदाच्या मुंबई मॅरेथॉनचा ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर आहे. मुंबईकरांच्या वेगाचे प्रतीक असलेल्या 'मुंबई मॅरेथॉन'मध्ये धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी तोही आज उपस्थित राहणार आहे. टायगर श्रॉफच्या फिटनेसमुळे तो सध्या तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. हेच लक्षात घेऊन यूथ आणि फिटनेस आयकॉन म्हणून टायगरला मॅरेथॉनचा ब्रँड बनविण्यात आले आहे. जेणेकरून अधिकाधिक तरुण आपल्या फिटनेसविषयी जागृत होतील. त्या जागरूकतेने सार्थक मलानी हा हाल्फ मॅरेथॉन धावणारा धावपटू स्वतःच्या गुडघ्याला दुखापत झालेली असताना तो धावत आहे. एवढेच नाही तर सार्थक मलानी हा पाठमोऱ्या रीतीने धावत आहे. धावण्याच्या शर्यतीत अडथळे अडचणी आल्यात तरी हर दिल मुंबई ह्या घोष वाक्याला साजेसे त्याचे धावणे अनोखे आहे.



बॅकवर्ड पद्धतीने मॅरेथॉनमध्ये धाव : काही हौशी मंडळी अनेक महिन्यापासून मॅरेथॉनसाठी धावण्याचा सराव करतात. विविध प्रकारचा व्यायाम रोज करतात. तसेच दोन किलोमीटर पाच किलोमीटर अशा अंतराने धावण्याचा हा सराव नियमित करतात. जेणेकरून त्या शर्यतीमध्ये त्यांची ऊर्जा टिकून राहावी. असा तो प्रयत्न असतो. सार्थकने देखील असा प्रयत्न केला. सराव करताना गुडघ्याला त्याला दुखापत झाली. मात्र तरीही तो जरा हळुवारपणे मात्र बॅकवर्ड पद्धतीने मॅरेथॉनमध्ये धावतोय.

हेही वाचा :india vs sri lanka : टीम इंडियाने पद्मनाभस्वामी मंदिरात जाऊन घेतले दर्शन; फोटो होतायत चांगलेच व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details