पुणे - पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. मात्र, या वाढत्या रुग्ण संख्येला पुणे महापालिकेतील सत्ताधारी पक्ष जबाबदार असल्याची टीका महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या शहराध्यक्षांनी केली आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे आणि शिवसेनेचे संजय मोरे उपस्थित होते.
पुण्यात कोरोना वाढीला सत्ताधारी भाजप जबाबदार; महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाजपवर टीका - PUNE CORONA UPDATE
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुण्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत सत्ताधारी भाजपला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. भाजपचे नगरसेवक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून काम करावे फक्त सोशल मीडियावर अपडेट देऊन कोरोना जाणार नसल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.
तिघांनीही पुण्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत सत्ताधारी भाजप जबाबदार असल्याचे म्हटले आहे. भाजपचे नगरसेवक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून काम करावे फक्त सोशल मीडियावर अपडेट देऊन कोरोना जाणार नसल्याची खोचक टीकाही त्यांनी केली. भवानी पेठेत प्रशासनाने एक महिन्याचे अन्नधान्य द्या मगच निर्बंध कडक करा, असे सांगतानाच श्रेय कोणीही घ्या मात्र परिस्थिती आटोक्यात आणा, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी यावेळी केली.
पालिकेच्या नायडू सारख्या रुग्णालयात आजच्या घडीला डॉक्टरांकडून एक्स-रे मशीन बंद केली जात आहे. ही खेदजनक बाब असून, प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. अशी टीका शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केली. तसेच फार्महाऊसवर बसून कार्यकर्त्यांना कामाला लावून कोरोना जाणार नाही. यासाठी रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी म्हटले आहे.