महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

RSS On INDIA OR Bharat: 'इंडिया की भारत'...राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं जाहीर केली भूमिका, वाचा सविस्तर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देशाच्या नावावर भूमिका

RSS On INDIA OR Bharat : काही दिवसांपासून देशाचं नाव 'इंडिया की भारत' हा नवा वाद पेटलाय. यावर प्रत्येक पक्ष, तज्ञ आपलं मत व्यक्त करतोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केलीय. याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काय वाटतं, हे सविस्तर जाणून घेवू या.

RSS on INDIA OR Bharat
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 3:29 PM IST

Updated : Sep 16, 2023, 5:10 PM IST

डॉ मनमोहन वैद्य यांची प्रतिक्रिया

पुणे RSS on INDIA OR Bharat: गेल्या काही दिवसांपासून देशात विरोधकांनी केलेल्या आघाडीनंतर केंद्र सरकारनं जी 20 च्या निमंत्रण पत्रिकेत भारत नाव वापरलंय. त्यानंतर देशात देशाचं नाव 'इंडिया की भारत' यावर चर्चा सुरू झालीय. आता यावरराष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपली भूमिका स्पष्ट केलीय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले की, देशाचं नाव हे 'भारत'च पाहिजे. भारत सोडून कोणत्याही देशाची दोन नावं नाहीत. भारत नावाला एक महत्त्व आहे. भारत नाव प्राचीन असून सभ्यता, चिंतन याच्याशी जुळते, असं यावेळी वैद्य यांनी सांगितलय.


तीन दिवशीय राष्ट्रीय बैठक :पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवशीय राष्ट्रीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यानंतर आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य आणि प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी याबाबत माहिती दिलीय.


पुष्पार्पण करून बैठकीस प्रारंभ :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक पुण्यात झाली. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या हस्ते पहिल्या दिवशी भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून बैठकीस प्रारंभ झाला. या बैठकीला 36 संघटनांचे प्रमुख 267 पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यात 30 महिला देखील होत्या.


बैठकीला उपस्थित : या बैठकीला उपस्थित असलेल्यांमध्ये प्रामुख्यानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल, डॉ. मनमोहन वैद्य, अरुण कुमार, मुकुंदा आणि रामदत चक्रधर, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्या जोशी, सुरेश सोनी, व्ही. भागय्या राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का. प्रमुख कार्यवाहिका अन्नदानम सीताक्का, महिला समन्वयच्या वतीने चन्दाताई, स्त्री शक्तीच्या अध्यक्षा शैलजा, राष्ट्रीय सेवा भारतीच्या महामंत्री रेणु पाठक, वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष रामचन्द्र खराडी, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष राजशरण शाही, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, भारतीय किसान संघाचे संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी, विद्या भारतीचे अध्यक्ष रामकृष्ण राव, पूर्व सैनिक सेवा परिषदेचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल विष्णुकान्त चतुर्वेदी (निवृत्त) भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष हिरण्मय पंड्या, संस्कृत भारती'चे संघटन मंत्री दिनेश कामत यांचा समावेश होता.


बैठकीत 'या' मुद्द्यांवर चर्चा : तीन दिवसांच्या या बैठकीत सध्याची राष्ट्रीय व सामाजिक परिस्थिती, शिक्षण, सेवा, आर्थिक व राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झालीय. सामाजिक परिवर्तनाशी संबंधित पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वदेशी आचरण तसंच नागरी कर्तव्याच्या विषयांना अधिक गती देण्यासंदर्भातही चर्चा झालीय.

डॉ. मनमोहन वैद्य यांची प्रतिक्रिया

मकर संक्रांतीनंतर प्राणप्रतिष्ठापना :राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना हा गेल्या काही दिवसांपासून देशाभरात लक्ष लागलेला विषय आहे. राम मंदिराचं काम पूर्ण झालंय. मंदिराचं उद्घाटन कधी होणार, याकडं संपूर्ण भारताचं लक्ष लागलंय. अश्यातच याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी याबाबत माहिती दिलीय. ते म्हणाले की, राम मंदिराची निर्मिती तर झाली आहे. प्राणप्रतिष्ठापना येत्या जानेवारीमध्ये मकर संक्रांतीनंतर जी तिथी येईल, तेव्हा होईल असं ते म्हणाले.

सनातन शब्दाचा अर्थ : आरक्षणावर बोलताना ते म्हणाले की, एस.सी, एस.टी. समाजाला दुर्दैवानं दुर ठेवण्यात आलंय. त्यांना संविधानाने दिलेलं आरक्षण मिळालं पाहिजे. मात्र, इतर आरक्षणाबाबत या बैठकीत चर्चा झाली नाही. सनातन धर्माला जे लोक नष्ट करण्याची भाषा करत आहेत, त्यांना सनातन या शब्दाचा अर्थ माहित आहे का? असा सवाल त्यांनी विचारलाय.

हेही वाचा :

  1. RSS Meeting in Pune : पुण्यात आरएसएसची तीन दिवसीय बैठक, 'हे' दिग्गज नेते राहणार उपस्थित
  2. Amit Shah News:आरएसएसचे सह सरकार्यवाह मदन दास देवी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, अमित शाह यांनी घेतले अंत्यदर्शन
  3. RSS Meeting in Pune : पुण्यात आरएसएसची तीन दिवसीय बैठक; तीन दिवस 'या' शाळांना सुट्टी
Last Updated : Sep 16, 2023, 5:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details