महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

RSS Meeting in Pune : पुण्यात आरएसएसची तीन दिवसीय बैठक; तीन दिवस 'या' शाळांना सुट्टी - Mohan Bhagwat

RSS Meeting in Pune : आरएसएसच्या बैठकीसाठी देशभरातील स्वयंसेवक पुण्यात आले असून, त्यांची राहण्याची आणि बैठकीची सोय टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन, एसपीएम इंग्रजी माध्यम शाळा आणि मूक बधीर शाळेत केली आहे. त्यामुळे शाळांना सलग तीन दिवस सुट्टी देण्यात आली आहे.

RSS Meeting in Pune
पुण्यात आरएसएसची तीन दिवसीय बैठक

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 12:17 PM IST

पुणे RSS Meeting in Pune : पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय समितीची तीन दिवसीय बैठक (RSS Meeting) पार पडत आहे. पुण्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या बैठकीसाठी दोन शाळा आणि एक महाविद्यालय तीन दिवस बंद राहणार आहेत. या शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारात ही बैठक होत असल्यामुळे यातील विद्यार्थ्यांना सलग तीन दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे.



शाळेला तीन दिवसांची सुट्टी : पुण्यातील टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन, एसपीएम इंग्रजी माध्यम शाळा आणि मूकबधिर शाळेला तीन दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तसंच अति महत्त्वाच्या व्यक्ती याठिकाणी वास्तव्यास असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहरातील इतर कुठल्याही शाळांना सुट्टी नाही.



36 संस्थांचे 266 प्रतिनिधी राहणार उपस्थित :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक आजपासून पुण्यामध्ये होणार आहे. 14 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान ही बैठक होत आहे. या बैठकीला संघ परिवारातील 36 संस्थांचे 266 प्रतिनिधी पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. यात 36 संघटनांमध्ये त्यांच्या संस्थेच्या कामासंबंधी म्हणजेच देशभरातील इतर विषयांवर चर्चा होणार आहे.

मागील वर्षातील कार्याचा घेणार आढावा :या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, (Mohan Bhagwat) भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह सर्व संघटनांचे वरिष्ठ पदाधिकारी बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत. संघ परिवारातील विविध संस्था संघटनांच्या मागील वर्षातील कार्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे पुढील वर्षासाठीच्या कामाची दिशा देखील ठरवली जाणार आहे. आगामी वर्ष हे निवडणुकीचं वर्ष आहे. त्याचप्रमाणे अयोध्येतील राम मंदिराची उभारणी पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर बैठकीतील मंथन आणि मार्गदर्शन महत्वाचं ठरणार आहे.

'या' मुद्द्यांवर होणार चर्चा : बैठकीत देशातील वर्तमान परिस्थिती, महिला संबंधी विषय, देशातील राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातील चर्चेतल्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. तसंच पर्यावरण, स्वदेशीसह आर्थिक प्रगती, सामाजिक समरसता या माध्यमातून सामाजिक समरसता यांचा उहापोह बैठकीत होणार आहे.

बैठकीत 'या' संघटनेचा सहभाग :या बैठकीत प्रामुख्याने राष्ट्र सेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पक्ष, भारतीय किसान संघ, विद्या भारती, भारतीय मजदूर संघ संस्कार भारती, सेवा भारती, संस्कृत भारती, अखिल भारतीय साहित्य परिषद या संघटना बैठकीत सहभागी झाल्या आहेत.

हेही वाचा -

  1. Madan Das Devi passed away : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मदनदास देवी यांचे निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख
  2. Saamana Criticized On RSS And Modi: कुरुलकरांच्या बाबतीत मामला कोकाकोला सारखा थंडा पडला- सामनातून भाजप आणि आरएसएसवर जोरदार टीकास्त्र
  3. RSS Meeting in Pune : पुण्यात आरएसएसची तीन दिवसीय बैठक, 'हे' दिग्गज नेते राहणार उपस्थित

ABOUT THE AUTHOR

...view details