बारामती -बारामती शहर पोलिसांनी शहरातील वसंत नगर टीसी कॉलेज रोड येथे तब्बल १३ लाख ८ हजार ८०० रुपयांचा गुटखा व गुटखा वाहतूक करणारा टेम्पो जप्त केला आहे. याबाबत पोलीस नाईक यशवंत ज्ञानदेव पवार यांच्या तक्रारीनुसार संतोष गायकवाड व एक अज्ञात व्यक्तीविरोधात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Gutkha Seized : बारामतीत तब्बल १३ लाख किमतीचा गुटखा जप्त - गुटखा जप्त कारवाई बारामती
वसंत नगर टीसी कॉलेज रोड येथे तब्बल १३ लाख ८ हजार ८०० रुपयांचा गुटखा व गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे. गुटखा तस्करी करणाऱ्या आरोपींनी मात्र पळ काढला. पोलिसांनी या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
![Gutkha Seized : बारामतीत तब्बल १३ लाख किमतीचा गुटखा जप्त Gutkha Seized](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15525356-thumbnail-3x2-a.jpg)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपाधीक्षक गणेश इंगळे यांना गोपनीय बातमीदाराकडून शहरातील वसंतनगर ते टीसी कॉलेज रोड दरम्यान टेम्पो (क्र MH12 QG 8872) मधून गुटखा वाहतूक केला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने इंगळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन वसंतनगर येथून टी.सी. कॉलेजकडे जाणाऱ्या बाजूकडे साधारण ३०० मिटर पायी चालत जात असताना मिशन हायस्कुल शेजारील रस्त्यावर सदर टेम्पो थांबलेला दिसला. पोलीस टेम्पो जवळ जाताच टेम्पोमधून संतोष गायकवाड व एक अज्ञात व्यक्ती हे मिशन हायस्कुलचे तार कंपाऊंडवरुन उडी मारुन अंधाराचा फायदा घेत पळून गेले. पोलिसांनी सदर टेम्पोची पाहणी केली असता पांढऱ्या पिशव्यांमध्ये गुलाम नावाचा ११,०८,८०० रुपयांचा गुटखा मिळून आला. पोलिसांनी २ लाख रुपयांचा टेम्पो सह तब्बल १३ लाख ८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
हेही वाचा -धक्कादायक..! पत्नीची लाकड्याच्या ढिगाऱ्यावर जिवंत जाळून हत्या; निर्दयी पतीला बेड्या