पुणे - कोरोनाच्या या महामारीत ज्यांना जसे शक्य होईल तसे लोकं, सामाजिक संस्था आपापल्या परिने गोरगरिबांना, गरजूंना मदत करत आहेत. आता गोरगरीब नागरिकांच्या मदतीला रेल्वे सुरक्षा बलाचे जवानही पुढे आले आहेत. सकाळी कर्तव्य पार पाडल्यानंतर रिकाम्या वेळेत स्वतः हा मास्क बनवून हे जवान गरजू नागरिकांना मदत करत आहेत.
आरपीएफचे जवान उतरले मदतीला, ड्युटी संपल्यावर मास्क बनवून गोरगरिबांना करत आहेत वितरण - rpf jawan making mask for free
आरपीएफचे 5 जवान रोज ड्युटी संपल्यावर आपल्या क्वार्टरवर जाऊन कमीतकमी 200 मास्क बनवून गरजू लोकांना मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे बंद असल्याने जास्त काम नाही म्हणून आपणही काही मदत करू शकतो या उद्देशाने आम्ही ही मदत करत असल्याची भावना हेडकाँस्टेबल अनिल पवार यांनी व्यक्त केली.
रेल्वेचे डिव्हिजनल कमिशनर अरुण कुमार त्रिपाठी यांच्या आदेशानुसार ज्यांना-ज्यांना मशीन काम येतं, असे जवान पुढे येत स्वतः हा मास्क बनवून लोकांना वाटप करत आहे. गेल्या एक आठवड्यापासून साधारणत: आम्ही 5 जवान रोज ड्युटी आंपल्यावर आपल्या क्वार्टरवर जाऊन कमीतकमी 200 मास्क बनवून गरजू लोकांना मदत करत असल्याचे जवानांनी सांगितले. आज सर्वच स्तरातून गोरगरीब नागरिकांना मदत मिळत आहे. रेल्वे बंद असल्याने जास्त काम नाही म्हणून आपणही काही मदत करू शकतो या उद्देशाने आम्ही ही मदत करत असल्याची भावना हेड काँस्टेबल अनिल पवार यांनी व्यक्त केली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत देशात आणि राज्यात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असलेले लोकं, बाहेर गावातील कामगार यांचे मोठया प्रमाणात हाल होत आहे. शहरात आज अशा गरजू नागरिकांना विविध संस्था संघटना मदत करत आहे. ज्यांना जसं शक्य होईल तशी मदत करावी, असे आवाहनही या जवानांकडून करण्यात आले आहे.