पुणे (पिंपरी चिंचवड)Rohit Pawar On BJP:पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष पदी माजी नगरसेवक तुषार कामठे यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आणि आज तुषार कामठे यांच्यासह आमदार रोहित पवार यांनी भव्य दुचाकी रॅली काढत अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात सुरंग लावला आहे. नवनिर्वाचित शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दुचाकी चालवली. तर आमदार रोहित पवार हे त्यांच्या मागे बसलेले होते.
पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष पदी माजी नगरसेवक तुषार कामठे यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली. आज तुषार कामठे यांच्यासह आमदार रोहित पवार यांनी भव्य दुचाकी रॅली काढत अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात सुरंग लावला आहे. निगडी येथील भक्ती शक्ती चौक ते नाशिक फाटा पर्यंत आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत दुचाकी दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. यानंतर रोहित पवार यांनी काळेवाडी येथे एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
आमदारकी कर्जत, जमनखेड मधूनच लढविणार- रोहित पवार:आगामी लोकसभा आपण लढणार का या प्रश्नावर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे की, मी लोकसभा लढणार नाही. विधानसभा मी कर्जत जामखेड येथूनच लढविणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र माझा मतदारसंघ आहे. कर्जत जामखेडच्या नागरिकांचे माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी मला मतदारसंघात भरभरून प्रेम दिलं आहे. यापुढेही देणार यात शंका नाही असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
अशांना निवडणुका भाजपाच्या चिन्हावर लढवाव्या लागलीत:सत्तेसाठी काही लोक भाजपाबरोबर गेले. मात्र लोकसभा निवडणुका झाल्यानंतर याच काही नेत्यांना भाजपाच्या कमळावर निवडणूक लढवावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोग भाजपाच्या हातचे बाहुले आहे. त्यामुळे आमचे चिन्ह, पक्षनाव काढून घेतले जाईल. पण, आमच्यासोबत शरद पवार आहेत. त्यामुळे आम्हाला कोणतीही अडचण नाही. आमचे काम जोरात सुरू आहे. पवार साहेब भाजपचे बाप आहेत. इलेक्शन कमिशन हे भाजपाच्या हातातील बाहुली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आमच्या बाजूने निर्णय देईल का, हे सांगणे कठीण आहे. मात्र तरीही पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे नसले तरी शरद पवार साहेब आमच्याकडे आहेत. पक्षाचे नाव देखील बदलले तरी विचार मात्र साहेबांचा असणार आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.