महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rohit Pawar On Ajit Pawar : मीरा बोरवणकर आरोप प्रकरण; पुतण्याचा काकाला पाठिंबा - Deputy Chief Minister Ajit Pawar

Rohit Pawar On Ajit Pawar : निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलंय. भाजपा अजित पवारांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न करतंय. अजित पवारांना कमकुवत करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केलाय. ते पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.

Rohit Pawar On Ajit Pawar
रोहित पवार

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2023, 7:54 PM IST

पुणे : Rohit Pawar On Ajit Pawar : निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपामागे भाजपाचा हात असावा, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला. रोहित पवार यांनी मंगळवारी अजित पवार यांच्याबाबत पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना 'हे' वक्तव्य केलंय.

यामागे भाजपा? : भाजपानं सातत्यानं भक्कम नेत्यांना कमकुवत करण्याचं राजकारण केलं आहे. अजित पवारांच्या प्रतिमेला धक्का देण्याचं काम ते लोकांमध्ये करत आहेत. हा त्याचाच एक भाग आहे का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. अचानक हा मुद्दा समोर येतो, लोक त्यावर चर्चा करतात, त्यावर अजित पवारांना उत्तर द्यावं लागतं?" यामागे नक्की काहीतरी घडतंय, असं देखील रोहित पवार म्हणाले. तसंच अजित पवारांचं वर्चस्व कमी करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय.

प्रकरणाची चौकशीची करा : निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार 2010 साली पुण्याचे पालकमंत्री असताना त्यांनी येरवडा कारागृह परिसरातील सरकारी जमीन खासगी बिल्डरला देण्याचे निर्देश दिले होते, असा गंभीर आरोप मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात केलाय. या आरोपामुळं गेल्या चार दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यापूर्वी रोहित पवार यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. मंगळवारी बोलताना त्यांनी यामागे भाजपाचा हात असण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं येरवडा भूखंडावरून अजित पवार यांच्यावर झालेल्या आरोपांमुळं आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना पाठिंबा दिल्याची चर्चा सुरू झालीय.

अजित पवारांचे स्पष्टीकरण : गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या आरोपांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्टीकरण दिलंय. त्यावेळी 'मी' पालकमंत्री होतो, मात्र मी बोरवणकरांना असा कोणताही आदेश दिला नसल्याचं त्यांनी सांगितलंय. 'मी' चुकीची कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांवर कधीही दबाव आणला नाही, असेही अजित पवार म्हणाले. त्यामुळं बोरवणकर यांनी पुस्तकात केलेल्या आरोपांशी माझा काहीही संबंध नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणाची संपूर्ण कागदपत्रे आपण पुन्हा तपासली असून त्यात आपली सही नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. कोणी काय बोलावे यावर आम्ही कोणतेही बंधन घालू शकत नाही असंही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. Ajit Pawar on Meera Borwankar : भूखंडाबद्दल 'मी' बोरवणकरांना विचारलं पण...; काय म्हणाले अजित पवार? वाचा सविस्तर
  2. Meera Borwankar Book : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्तांचा 'दादां'वर गंभीर आरोप, पुस्तकात केला 'हा' मोठा खुलासा
  3. Meera Borwankar : अजित पवारांनी पोलिसांच्या जमिनीचा लिलाव केला, पुस्तकात लिहिलेलं १०० टक्के सत्य; मीरा बोरवणकर ठाम

ABOUT THE AUTHOR

...view details