महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जनतेच्या हितासाठी सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावणार - रोहित पवार - balasaheb thorat latest news

जनतेने आम्हाला विरोधी भूमिका बजावण्याची संधी दिलेली आहे. ती आम्ही सक्षमपणे पार पाडू. असे प्रतिपादन रोहित पवार यांनी केले आहे. बारामती येथील गोविंद बागेत  त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आमदार रोहित पवार

By

Published : Oct 26, 2019, 7:54 PM IST

पुणे - जनतेने आम्हाला विरोधी भूमिका बजावण्याची संधी दिलेली आहे. ती आम्ही सक्षमपणे पार पाडू. सरकारने मागील पाच वर्षांप्रमाणेच कारभार पुन्हा चालू ठेवला तर, आम्ही जनतेच्या हितासाठी त्यांना जोरदार विरोध करू आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावू असे प्रतिपादन रोहित पवार यांनी केले आहे. बारामती येथील गोविंद बागेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आमदार रोहित पवार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे आज(26 ऑक्टोबर) पवारांच्या निवास्थानी आले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली. या चर्चेबाबत रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, ही भेट एक अनौपचारिक भेट होती. दिवाळीच्या सणानिमित्त थोरात साहेब पवार साहेबांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी राजकीय विषयाबाबत चर्चा झाली नाही.

हेही वाचा -विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच, पवार कोणाच्या गळ्यात टाकणार माळ?

विजयी झाल्यानंतर प्रतिस्पर्धी उमेदवार राम शिंदे यांच्या भेटीबद्दल बोलताना पवार म्हणाले, लोकशाहीत सर्वांचा सहभाग महत्वाचा असतो. शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न केले. हार-जीत होत असते. जनतेच्या विकासासाठी मी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले. ही संस्कृती आहे आणि पवार साहेबांची शिकवण आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details