पुणे - येथील पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस कटरने एटीएम कापून चोरट्यांनी तब्बल ११ लाख रुपये लंपास केले. शुक्रवारी अॅक्सिस बँकेने संबंधित एटीएममध्ये मोठी रक्कम भरली होती. मात्र, आज एटीएम फोडले असल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. अज्ञात चोरांचा चिखली पोलीस आणि गुन्हे शाखा शोध घेत आहे.
पुण्यात गॅस कटरने एटीएम फोडून ११ लाख रुपये लंपास - पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस कटरने एटीएम कापले बातमी
नेवाळे वस्ती, चिखली येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये शुक्रवारी सायंकाळी बँकेने रोकड भरली. सोमवारी दुपारी बँकेच्या प्रतिनिधीला एटीएम फोडल्याचे लक्षात आले. या एटीएममध्ये सुमारे अकरा लाख रुपयांची रोकड होती.
हेही वाचा-काँग्रेस हायकमांड घेतील तो निर्णय अंतिम असेल - खासदार हुसेन दलवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेवाळे वस्ती, चिखली येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये शुक्रवारी सायंकाळी बँकेने रोकड भरली. सोमवारी दुपारी बँकेच्या प्रतिनिधीला एटीएम फोडल्याचे लक्षात आले. या एटीएममध्ये सुमारे अकरा लाख रुपयांची रोकड होती. मात्र, सोमवारी दुपारपर्यंत बँकेच्या प्रतिनिधींना याबाबत माहिती नव्हती. दरम्यान, बँकेला रविवारी या घटनेची माहिती मिळाली होती. त्यानुसार अधिकारी आले. मात्र, ते दुसऱ्याच पत्त्यावर गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी चिखली पोलीस तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी दाखल झाले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.