महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये घरफोडी, तब्बल २ लाखांचा ऐवज लंपास

रामचंद्र कृष्णाजी कागदलकर (वय ६९ रा. यमुनानगर पिंपरी-चिंचवड) यांचे घर नोव्हेंबर महिन्यात काही दिवस बंद होते. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरुममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून कपाटातून २ लाख २४ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा ऐवज चोरांनी लंपास केला आहे. रामचंद्र गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला.

निगडी पोलीस ठाणे, पुणे

By

Published : Nov 8, 2019, 5:09 PM IST

पुणे - येथील पिंपरी-चिंचवडमध्ये घरफोडीचा प्रकार समोर आला आहे. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी उघडकीस आली. या घटनेत अज्ञात चोरट्यांनी एकूण २ लाख २४ हजारांचे दागिने लंपास केले आहेत.

रामचंद्र कृष्णाजी कागदलकर (वय ६९ रा. यमुनानगर पिंपरी-चिंचवड) यांचे घर नोव्हेंबर महिन्यात काही दिवस बंद होते. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरुममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून कपाटातून २ लाख २४ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा ऐवज चोरांनी लंपास केला आहे. रामचंद्र गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा -ओडिशा : एक लाखाचे इनाम असलेल्या महिला माओवाद्याचे आत्मसमर्पण

यानंतर रामचंद्र यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा -मी फोनची वाट बघतोय, कुणी फोन करतच नाही - जितेंद्र आव्हाड

ABOUT THE AUTHOR

...view details