महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाबळमध्ये मध्यरात्री दरोडा, दोन महिला जखमी - दरोड्यात 28 हजार चोरी

मात्र चोरीच्या उद्देशाने आलेल्या दोन चोरट्यांनी थेट आजीच्या गळ्यातील सोन्याचा गंठन ओरबडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घरात प्रवेश करत आजीचे गंठण, कंबरेला असलेला बटवा, आणि काही कपडे घेऊन चोरट्यांनी तेथून पळ काढला.

पाबळमध्ये मध्यरात्री दरोडा
पाबळमध्ये मध्यरात्री दरोडा

By

Published : May 2, 2021, 9:04 AM IST

पुणे - जिल्ह्यातील पाबळमध्ये शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री दरोडा पडल्याची घटना घडली आहे. पाबळ येथील जगदाळे मळा येथे हा दरोडा पडला, या दरोड्यात झालेल्या झटापटीत साळुंखे कुटुंबतील दोन महिला जखमी झाल्या आहेत, तर चोरट्यांनी 28 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

नातू आला असेल म्हणून उघडले दार

दरवाज्यावर टक टक असा आवाज आला, त्यावेळी आपला नातू कामावरून आला असेल या आशेने आजीने दार उघडले. मात्र चोरीच्या उद्देशाने आलेल्या दोन चोरट्यांनी थेट आजीच्या गळ्यातील सोन्याचा गंठन ओरबडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घरात प्रवेश करत आजीचे गंठण, कंबरेला असलेला बटवा, आणि काही कपडे घेऊन चोरट्यांनी तेथून पळ काढला. यावेळी झालेल्या झटापटीत दोन महिला जखमी असून एक महिला भोसरी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तर एका महिलेस किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

28 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

या जबरी चोरीची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनला कळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक विक्रम नारायण साळुंखे यांच्यासह सहकारी पोहचले असता, सुमारे एक तोळ्यांचा गंठन, कंबरेला असणाऱ्या पिशवीतील रोख रक्कम रुपये तीन हजार व घरातील कपडे आणि इतर साहित्य अशी एकूण अंदाजे 28 हजार इतका मुद्देमाल दोन अज्ञात चोरट्यांनी चोरला असल्याची माहिती मिळाली.

याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तीच्या विरोधात 394, 397 व 34 कलमातर्गत गुन्हा नोंद केला असून अधिक तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत. संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दुसऱ्या पाळीत कामावरून येणाऱ्या कामगारांच्या मनात कामाला जावे की नको, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details