पुणे - अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ओझर येथील विघ्नहर गणपती मंदिरात पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. विघ्नहर गणपती मंदिरातील चांदीची छत्री व दानपेटी लंपास करण्यात आली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना घटनास्थळी दाखल झाले आहेत.
अष्टविनायक : पुण्यातील ओझरच्या विघ्नहर गणपती मंदिरात दरोडा; चांदीची छत्री व दानपेटी लंपास - पुणे गुन्हे वार्ता
अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ओझर येथील विघ्नहर गणपती मंदिरात पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे.
![अष्टविनायक : पुण्यातील ओझरच्या विघ्नहर गणपती मंदिरात दरोडा; चांदीची छत्री व दानपेटी लंपास robbery at ozar ganesh](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8201176-thumbnail-3x2-ozar.jpg)
महामारीच्या काळात कोरोनाचा समूह संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने देव दर्शन व मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बंद मंदिराला लक्ष करून दरोडेखोरांनी आज पहाटे डाव साधला.
यामध्ये गाभाऱ्यातील चांदीच्या वस्तू, चांदीची छत्री व दानपेटीची चोरी झाली आहे. चोरीचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने फुटेजच्या आधारे पोलीस अज्ञात चोरांचा शोध घेत आहेत. मागील चार महिन्यांपासून ओझर देवस्थान मंदिर देवदर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. याचाच फायदा उचलत चोरट्यांनी मंदिरातील महागड्या वस्तूंवर हात साफ केला.