महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोबाइलच्या दुकानावर दरोडा, सव्वा नऊ लाखांची चोरी - latest mobile news

सुपा बसस्थानक परिसरात असणाऱ्या नवजीवन मोबाइल व इलेक्ट्रीकल दुकानाचे लोखंडी शटर उचकटून आतील काचेच्या जाड दरवाजास दगडाचा साह्याने फोडत पाच अज्ञात चोरट्यांनी चोरी केली.

मोबाइलच
मोबाइलच

By

Published : Dec 6, 2020, 1:34 PM IST

बारामती -सुपे बसस्थानक परिसरात असणाऱ्या मोबाइल विक्री व इलेक्ट्रिक दुकानाचे शटर उचकटून रोख रकमेसह सव्वानऊ लाखांची चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मयूर रामदास लोणकर (वय २१, रा. गदादे वस्ती, सुपे. ता. बारामती) यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर घटना शनिवार दि. ५ रोजी पहाटे घडली. सुपा बसस्थानक परिसरात असणाऱ्या नवजीवन मोबाइल व इलेक्ट्रीकल दुकानाचे लोखंडी शटर उचकटून आतील काचेच्या जाड दरवाजास दगडाचा साह्याने फोडत पाच अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामध्ये चोरट्यांनी रोख रकमेसह सव्वा नऊ लाख रुपये किमतीचे मोबाइल फोन, अ‌ॅक्सेसरीज लंपास केले. दरम्यान, चोरट्यांच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून त्या आधारे पोलीस तपास करत आहेत

दुकान उघडायला गेल्यावर समजले चोरी झाली

नमूद फिर्यादीनुसार, सुपे बसस्टॉप शेजारी सुपे-चौफुला रोड लगत असणाऱ्या चांदगुडे बिल्डिंगशेजारी नवजीवन मोबाइल व इलेक्ट्रीकल या नावाचे दुकान आहे. शनिवारी सकाळी सुमारास फिर्यादी लोणकर यांनी दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना दुकानाचे शटर अर्धवट उघडल्याचे दिसून आले. काचेचा दरवाजा फोडलेला दिसला. आत पाहणी केली असता दुकानातील मोबाइल जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

मोबाइल

चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

चोरट्यांच्या सर्व हालचाली दुकानाच्या दारातील व आतील सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाल्या आहेत. पहाटे आलेल्या तिघांनी शटर उचकटले व नंतर आणखी दोन तरुणांनी दुकानाच्या आतमध्ये प्रवेश केला. यानंतर दुकानातील मोबाइल चोरट्याने पिशवीमध्ये भरले. दरम्यान, चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी दुकानाची रेकी केली असावी किंवा चोरट्यांस दुकानाची पूर्ण माहिती असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details