पुणे- गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. यात नागरिकांवर प्राणघातक हल्ले करत दरोडा टाकला जात आहे. आज (सोमवार) रात्रीच्या सुमारास शिरुर तालुक्यातील केंदूर व रावडेवाडी या दोन गावात चोरीच्या घटना घडल्या असून केंदूर येथील वृद्ध दाम्पत्याला चोरट्यांनी जबरी मारहाण केल्याचे प्रकार समोर आला आहे.
शिरुर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दरोडेखोरांकडून वृद्ध दाम्पत्याला जबरी मारहाण - robbers hitting to aged couple in kendur village
या मारहाणीत कोंडीभाऊ विठोबा साकोरे व लक्ष्मीबाई कोंडीभाऊ साकोरे या पती-पत्नी दाम्पत्याची प्रकृती गंभीर आहे. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
केंदूर गावामध्ये चोरट्यांनी चोरी करत वृद्ध शेतकरी दाम्पत्याला जबर मारहाण केली आहे. या मारहाणीत कोंडीभाऊ विठोबा साकोरे व लक्ष्मीबाई कोंडीभाऊ साकोरे या पती-पत्नी दाम्पत्याची प्रकृती गंभीर आहे. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, दुसऱ्या घटनेत रावडेवाडी गावात चोरट्यांनी दुकानातील मालाची चोरी केली आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यात दरोड्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दरोडेखोर चोरी करून नागरिकांना जबरी मारहाण करत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून या चोरट्यांना पकडण्याचे पुणे ग्रामीण पोलिसांपुढे पुढील काळात मोठे आव्हान असणार आहे.