खेड तालुक्यातील कोरोनाबाधित गावांमध्ये रस्ते वाहतुकीसाठी बंद - Corona affected villages in Khed
पुणे, मुंबई परिसरात अनेक नागरिक ग्रामीण भागात येऊ लागल्याने खेड तालुक्यातील रेड झोनमधील गाव वस्त्यांवरील रस्ते प्रशासनाकडून बंद करण्यात आले आहेत.

पुणे- खेड तालुक्यात कोरोनाचा समूह संसर्ग झपाट्याने वाढला असून रुग्णांची संख्या 15 वर गेली आहे. पुणे, मुंबई परिसरात अनेक नागरिक ग्रामीण भागात येऊ लागल्याने कडूस परिसरातील रेड झोनमधील गाव वस्त्यांवरील रस्ते प्रशासनाकडून बंद करण्यात आले आहेत.
खेड तालुक्यात पुणे, मुंबई परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक दाखल झाले. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. यामध्ये 15 जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रशासनाकडून गांभिर्याने दखल घेतली जात आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहे.
कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांनी आपले आजार लपवून ठेऊ नये आणि स्वतःला क्वारंटाईन करुन घ्यावे, असे आवाहन तहसीलदार सुचित्रा आमले यांनी केले आहे.