पुणे- एकीकडे देशात स्मार्ट सिटी सारख्या घोषणा होत असताना शिरूर तालुक्यातील चांडोह गावात मात्र विदारक परिस्थिती पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्यापासून आजतागायत या गावांमध्ये नागरिकांना दळणवळणासाठी चांगला रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे शाळकरी मुलांसह नागरिकांना पावसाळ्यात चिखल तुडवत या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.
देश चंद्रावर चालला मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी आजही चिखल तुडवतच शाळेत जातोय - शिरूर
शिरूर तालुक्यातील चांडोह ते जांबूत या २ गावांना जोडणाऱ्या या रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून नागरिकांसह शाळेतील विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे काही दुर्घटना झाल्यानंतरच सरकार व ग्रामपंचायतला जाग येणार का? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
चांडोह ते जांबूत या २ गावांना जोडणाऱ्या या रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरुन नागरिकांसह शाळेतील विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे काही दुर्घटना झाल्यानंतरच सरकार व ग्रामपंचायतला जाग येणार का? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
जांबूत हे गाव बाजाराचे गाव असल्याने आजूबाजूच्या वाड्यावस्तीतील ग्रामस्थांचा दळणवळणासाठीचा हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे जर याच रस्त्याची अशी अवस्था असेल तर आम्ही प्रवास तरी कसा करायचा ? असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.