पुणे : बेकायदा बाइक टॅक्सी (bike taxi service Pune) वाहतुकी विरोधात पुण्यातील आरटीओ कार्यालयाबाहेर (Pune RTO office) रिक्षा चालकांचे चक्का आंदोलन (Rickshaw drivers protest) रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले आहे. (Pune Crime) तसेच यावेळी रिक्षा चालकांनी गाणी आणि भजन म्हणत राज्य सरकार आणि अधिकाऱ्यांचा निषेध नोंदविला. (Latest news from Pune)
Rickshaw Drivers Protest : आरटीओ कार्यालयाबाहेर रिक्षा चालकांचे चक्काजाम आंदोलन सुरू; जाणून घ्या कारण... - bike taxi service Pune
12 डिसेंबर पर्यंत बाईक टॅक्सी (bike taxi service Pune) बंद न झाल्याने रिक्षा चालक आक्रमक झाले असून आजपासून पुन्हा प्रादेशिक परिवहन कार्यालय बाहेर (Pune RTO office) एकत्र येत चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. रॅपिडो बाइक टॅक्सी वाहतुकी विरोधात आम्ही 28 नोव्हेंबर रोजी देखील आंदोलन (Rickshaw drivers protest) केले होते. (Latest news from Pune) त्यानंतर देखील रॅपिडो कंपनी मार्फत बाइक टॅक्सी वाहतुक सुरू आहे. (Pune Crime)
![Rickshaw Drivers Protest : आरटीओ कार्यालयाबाहेर रिक्षा चालकांचे चक्काजाम आंदोलन सुरू; जाणून घ्या कारण... Rickshaw Drivers Protest](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17182149-thumbnail-3x2-protest.jpg)
रिक्षा चालक आक्रमक :28 नोव्हेंबर रोजी बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात रिक्षा आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शासनाच्या वतीने येत्या 12 डिसेंबरपर्यंत बेकायदा बाईक टॅक्सी बंद करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. पण 12 डिसेंबर पर्यंत बाईक टॅक्सी बंद न झाल्याने रिक्षा चालक आक्रमक झाले असून आजपासून पुन्हा प्रादेशिक परिवहन कार्यालय बाहेर एकत्र येत चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे.
भूमिकेवर ठाम :रॅपिडो बाइक टॅक्सी वाहतुकी विरोधात आम्ही 28 नोव्हेंबर रोजी देखील आंदोलन केले होते. त्यानंतर देखील रॅपिडो कंपनी मार्फत बाइक टॅक्सी वाहतुक सुरू आहे. त्यामुळे आज आरटीओ कार्यालयाबाहेर बेमुदत चक्का जाम आंदोलन केले जात आहे. रॅपिडो कंपनी बाइक टॅक्सी बंद करीत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका रिक्षा चालकांनी घेतली आहे. रिक्षा चालकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे. या चक्का जाम आंदोलनात शहरातील 16 रिक्षा संघटना एकत्र येत आंदोलन करत आहेत.