पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लावलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. रिक्षाचालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून रिक्षाचे चाक एकाच ठिकाणी थांबले आहे. पुण्यात अशी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांचा फक्त रिक्षा चालवण्याचा व्यवसाय आहे. कुटुंब मोठे आणि घरात एकच मिळवती व्यक्ती असल्याने लॉकडाऊनमध्ये अशा कुटुंबांचे खूप हाल होत आहेत. 'जेवढे कमवले तेवढे सगळे संपले, आता मदत मागायची तरी कोणाकडे आणि किती वेळा' असे सांगत पुण्यातील अप्पर येथील शिवनेरी रिक्षा संघटनेतील रिक्षाचालकांनी 'रिक्षा विकायची आहे', असे फलक लावले आहेत.
लॉकडाऊनमुळे परिस्थिती हाताबाहेर, खायला अन्न नाही.. रिक्षा विकणे आहे.. आम्ही आमच्या संघटनेतर्फे मदत केली, पण आम्हालाही काही मर्यादा आहे म्हणून आम्हीही आता काही करू शकत नाही. सरकारने मदत करायला हवी, अशी अप शिवनेरी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोक साळेकर यांनी व्यक्त केली. या रिक्षा संघटनेतील सुनीता गोरे, पूनम गायकवाड, विमल थोरात, शारदा भोईने या महिलांनी 'रिक्षा विकणे आहे' असे फलक हातात घेऊन आपली व्यथा व्यक्त केली.
लॉकडाऊनमुळे परिस्थिती हाताबाहेर, खायला अन्न नाही.. रिक्षा विकणे आहे.. लॉकडाऊनमुळे परिस्थिती हाताबाहेर, खायला अन्न नाही.. रिक्षा विकणे आहे.. माझ्या रिक्षावर दोन कुटुंबे चालतात. सुरुवातीला 'जेवढे होते तेवढे आता संपले.. आता मदत कोण करणार? म्हणून आता रिक्षा विकणे, हाच एकमेव उपाय राहिला आहे,' असे सुनीता गोरे यांनी म्हटले.
'रिक्षामुळे कुटुंब सुरळीत चालले होते. वाटले नव्हते, अशी वेळ कधी आमच्यावर येईल. आयुष्यात अनेक संकटांना तोंड देत आलो, पण या संकटाने विचार करायला भाग पाडले की, आता काय?', असे रिक्षाचालक पूनम गायकवाड म्हणाल्या.
पुणे शहरात मोठ्या प्रमाणत रिक्षाचालक आहे. अनेकांचे कुटुंब फक्त रिक्षावर असल्याने या लॉकडाऊनमुळे या कुटुंबावर आज उपासमारीची वेळ आली आहे. अनेक दानशूर व्यक्तींनी आपापल्या परीने मदत केली असली तरी त्यानांही मर्यादा आहे. पुण्यात असे चित्र कधी पाहायला मिळेल, असा कोणी विचार केला नसेल. पण कोरोनाने हेही चित्र दाखवले, असे या रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.