महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी येथे विविध मागण्यांसाठी रिक्षा चालक, मालकांचे 'बोंबाबोंब' आंदोलन - rickshaw drivers protest pimpri

सरकारने राज्यात एस.टी बस, मुंबईमध्ये बेस्टला आणि पुण्यात पीएमपी वाहतुकीस परवानगी दिली आहे. आज रोजी ७० टक्के रिक्षा बंद आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून बंद असलेली रिक्षा सेवा तात्काळ सुरू करावी आणि रिक्षाचालकांच्या इतरही मागण्या सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.

रिक्षा चालक आंदोलन पिंपरी
रिक्षा चालक आंदोलन पिंपरी

By

Published : Sep 30, 2020, 5:22 PM IST

पुणे- आज पिंपरी-चिंचवडमध्ये विविध मागण्यांसाठी रिक्षा पंचायतच्या वतीने सरकार विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन पार पडले. राज्य सरकारने रिक्षाचालकांचे प्रश्न न सोडवल्याने रिक्षा चालकांनी संताप व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते, रिक्षा चालक, मालक उपस्थित होते.

पिंपरी येथे विविध मागण्यांसाठी रिक्षा चालक, मालकांचे 'बोंबाबोंब' आंदोलन

सरकारने राज्यात एस.टी बस, मुंबईमध्ये बेस्टला आणि पुण्यात पीएमपी वाहतुकीस परवानगी दिली आहे. आज रोजी ७० टक्के रिक्षा बंद आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून बंद असलेली रिक्षा सेवा तत्काळ सुरू करावी आणि रिक्षाचालकांच्या इतरही मागण्या सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला. तसेच, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजय अवतारे यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण १२० रिक्षा स्टँडवरती हे आंदोलन करण्यात आले.

रिक्षा चालक, मालक यांच्या मागण्या

१) रिक्षा चालकांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये मिळावे.

२) शेतकऱ्यांच्या धर्तीवर रिक्षा चालकांचे कर्ज माफ करावे. त्यांची आरसी बुक कोरी करावी.

३) मुक्त रिक्षा परवाना बंद करावा. ओला, उबरवर निर्बंध आणावेत.

४) रिक्षा चालक, मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे.

५) फायनान्स कंपनी आणि बँकेच्या वतीने हप्ते वसुलीसाठी रिक्षा चालकांना त्रास दिला जात आहे. याबाबत सक्त वसुली आणि गुंडागर्दी, दादागिरी करू नये, असे आदेश सरकारने संबंधित सर्व फायनान्स कंपन्या आणि बँकांना द्यावेत.

६) रिक्षा चालक, मालकांसाठी घरकूल योजना राबवावी.

७) रिक्षा चालक, मालकांसाठी कोविडच्या काळात ५० लाखाचा विमा मिळावा.

हेही वाचा-अतिवृष्टीत कांदा रोप नष्ट; यंदा लागवड क्षेत्र घटणार

ABOUT THE AUTHOR

...view details