पुणे- पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात मंगळवारी रात्री एका रिक्षाचालकाची हत्या झाली होती. राहुल विनायक जगताप (वय 48) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. अज्ञात आरोपीने राहुलचा रिक्षा अडवून त्याच्यावर कोयत्याने वार केले होते. या प्रकरणातील आरोपीला शोधण्यात कोरेगाव पार्क पोलिसांना यश आले आहे. राहुलच्या मित्रानेच ही हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. प्रीतम उर्फ बाळू उर्फ पांग्या रघुनाथ मोरे (वय 36) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी राहुल जगतापच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींकडे विचारपूस केली. यात प्रीतम मोरे यांचे नाव संशयित म्हणून पुढे आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता खून केल्याची प्रीतमने कबुली दिली.
पुण्यात रिक्षाचालकाची कोयत्याने हत्या प्रकरण... मित्रानेच काटा काढल्याचे तपासात उघड - पुणे हत्या बातमी
मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास राहुल जगताप हा काम संपल्यानंतर रिक्षातून घरी जात होता. दरम्यान, कोरेगाव पार्क परिसरातील लेन नंबर 5 मध्ये प्रीतमने राहुलची रिक्षा अडवली. काही समजण्याच्या आत त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले.
राहुल आणि प्रीतम एकमेकांचे चांगले मित्र होते. राहुल जगताप याला दारू पिण्याचे व्यसन होते. दारू पिल्यानंतर तो प्रीतम याला शिवीगाळ आणि मारहाण करायचा. दोन दिवसांपूर्वीही राहुल जगताप याने दारू पिल्यानंतर प्रीतमला शिवीगाळ केली आणि लाथ मारली होती. त्यामुळे राहुलकडून होणारी सततची मारहाण आणि अपमान याचा बदला घेण्यासाठी प्रीतमने राहुलचा खून केला.
मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास राहुल जगताप हा काम संपल्यानंतर रिक्षातून घरी जात होता. दरम्यान, कोरेगाव पार्क परिसरातील लेन नंबर 5 मध्ये प्रीतमने राहुलची रिक्षा अडवली. काही समजण्याच्या आत त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात राहुलचा जागीच मृत्यू झाला.