पुणे :बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या बाईक टॅक्सी विरोधात शहरातील तब्बल 16 रिक्षा संघटनांनी एकत्र येत या विरोधात बंद एक दिवस काटेकोर बंद आंदोलन करण्यात आले. यानंतर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट देखील घेतली. पण आत्ता याच रिक्षा संघटनेत फूट पडलेली पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी वारंवार नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना आंदोलन समितीतून वगळण्यात ( Rickshaw Association Split ) आले. तर दुसरीकडे बाबा शिंदे यांनी या संघटनांवर गंभीर आरोप केले ( Baba Shinde serious allegations against rickshaw associations ) आहे.
रिक्षा संघटनांमध्ये फूट : महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी जाणून बुजून पत्रकार बांधवांसमोर वाद उकरून काढून आंदोलनात फूट पडेल असा प्रयत्न ( Baba Kamble excluded agitation committee ) करणे. समितीला अंधारात ठेवून परस्पर प्रादेशिक परिवहन अधिकारी व आंदोलनाशी संबंधित बाईक टॅक्सीबाबत इतर अधिकारी यांची परस्पर भेट घेऊन पारदर्शक कार्यपद्धतीच्या नियमांचा भंग करणे. तसेच २८ नोव्हेंबर २०२२ रोजी चक्काजाम आंदोलन सुरू झाल्यावर आंदोलनस्थळावरून मधूनच निघून जाणे. आंदोलनाची कायदेशीर जवाबदारी सर्वांची सामायिक असेल हे लेखी मान्य करून सुद्धा आंदोलनानंतर गुन्हे दाखल झाल्यावर संताप करून त्याचे खापर इतरांवर फोडणे, आंदोलनकर्त्यांमध्ये गैरसमज पसरवणे. आंदोलनात ठरवून बोलायची वेळ दिलेली असताना 2-2 वेळा एक-एक तास भाषण केल्यामुळे इतर अनेकांना विशेषतः सामान्य रिक्षाचालकांना व्यक्त होण्याची संधी न मिळणे. आंदोलन समितीचा एकच फ्लेक्स लागेल हे ठरलेले असताना प्रादेशिक परिवहन विभाग परिसरात स्वतः चे अनेक फ्लेक्स लावून आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न करणे व समिती मधील वातावरण दूषित करणे अशी माहिती बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी दिली.