पुणे : पुण्यात कोयता गँगच्या दहशतीने नागरिकांत भीती निर्माण होते आहे. कोयता गँगची दहशत पहाता पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचे अव्हान आहे. त्ययावर आता पोलिसांनी शक्कल लढवली आहे. कोयता गँगचा आरोपी पकडून दिल्यास ३ हजारांचे बक्षीस पुणे पोलिसांनी जाहिर केले आहे. तसेच बंदूक जवळ बाळगणाऱ्या आरोपीला पकडल्यास 10 हजार बक्षीस मिळणार आहे. तर, वॉन्टेड, फरार आरोपी पकडून दिल्यास त्यालाही 10 हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. मोक्का किंवा एमपीडीएतील आरोपी पकडल्यास 5 हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील पूर्व आणि पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्तांनी हे बक्षीस जाहीर केले आहे.
कोयता गॅंगने हौदोस घातला :गेल्या काही दिवसांपासून कोयता गॅंगने पुण्यात हौदोस घातला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोयता गॅंगकडून पुण्यात ठिकठिकाणी हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरामध्ये या गुंडांचा वाढत प्रभाव पाहता पोलिसांपुढे सुद्धा मोठे आव्हान आहे. त्याच पार्श्वभूमीवर या गुंडांचा बंदोबस्त करणाऱ्या पोलिसाना बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.