महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिरुर लोकसभा : आढळराव-पाटील 'चौकार' मारणार, की अमोल कोल्हे क्लीन बोल्ड करत दिल्ली गाठणार?

शिरूर लोकसभा मतदारसंघाची सध्या महाराष्ट्रभर जोरदार चर्चा आहे. या मतदारसंघातील लढत ही अत्यंत तुल्यबळ समजली जात आहे. येथून युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे चौथ्यांदा तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना मैदानात उतरले आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघ

By

Published : Apr 20, 2019, 12:56 PM IST

Updated : Apr 21, 2019, 7:33 PM IST

पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघाची सध्या महाराष्ट्रभर जोरदार चर्चा आहे. या मतदारसंघातील लढत ही अत्यंत तुल्यबळ समजली जात आहे. येथून युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे चौथ्यांदा तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना मैदानात उतरले आहे. या मतदारसंघात आढळराव पाटलांनी थेट पवारांना आव्हान दिले होते. तर राष्ट्रवादीने अमोल कोल्हेंना तिकीट देऊन आढळराव पाटलांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.

१२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले भीमाशंकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ, वारकऱ्यांची पंढरी असलेली आळंदी, अष्टविनायकांपैकी ओझर, लेण्याद्री, रांजणगाव, थेऊर या ठिकाणांचा इतिहासाचा वारसा लाभलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघावर गेल्या १५ वर्षांपासून शिवाजी आढळराव पाटलांनी आपली पकड कायम ठेवली आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघ

शिरूर लोकसभा मतदारसंघावर मागील १० वर्षांपूर्वी विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पकड भक्कम असतानाही शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना मोठे मताधिक्य मिळाले होते. मात्र, यावेळी हे मताधिक्य कमी करण्यासाठी राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडून स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन आढळरावांच्या 'चौकाराला' क्लीनबोल्ड करण्यासाठी भक्कम फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. दत्तात्रयाची तीन मुले दिलीप मोहिते, दिलीप वळसे पाटील आणि वल्लभ बेनके या तिघांनीही आढळरावांना चितपट करण्यासाठी मतदारसंघ पिंजून काढला आहे. मात्र, या मतदारसंघात दोघांनाही ही निवडणूक सोपी नसल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.


२०१४ ची परिस्थिती

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांचा तब्बल ३ लाख १ हजार ४५३ मतांनी पराभव केला होता.


२०१४ निवडणुकीची आकडेवारी

शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना):- 6 लाख 43 हजार 415
देवदत्त निकम (राष्ट्रवादी काँग्रेस) :- 3 लाख 41 हजार 601


पक्षीय बलाबल

शिरूर लोकसभा मदरसंघात ६ विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. यामध्ये ३ ठिकाणी भाजपचे, २ जागेवर शिवसेनेचे तर एका ठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे

शिरूर - बाबुराव पाचर्णे (भाजप)
हडपसर - योगेश टिळेकर (भाजप)
भोसरी -–महेश लांडगे (अपक्ष आमदार भाजप संलग्न)
खेड-आळंदी - सुरेश गोरे (शिवसेना)
जुन्नर - शरद सोनवणे (मनसेतुन शिवसेनेत प्रवेश)
आंबेगाव -–दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जनमानसामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तर दुसरीकडे डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून प्रत्येक घराघरात स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोल्हे व आढळराव पाटील या दोघांचीही लोकप्रियता तुल्यबळ असल्याचे चित्र दिसत आहे.


मतदारसंघातील प्रश्न

या मतदारसंघात महामार्गांवरील वाहतूक कोंडी, विमानतळ, पुणे नाशिक रेल्वे व इतर नागरी सुविधा यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्याचे चित्र आहे. मात्र, यातील एकही प्रश्न प्रत्यक्षात मार्गी लागला नाही. त्यामुळे आता आढळराव पाटील चौकार मारणार की अमोल कोल्हे त्यांनी क्लिन बोल्ड करत दिल्ली गाठणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Last Updated : Apr 21, 2019, 7:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details