महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रासाठी २० टक्के ऑक्सिजनच्या वापराला मंजुरी

कोरोना रुग्णवाढीचा दर जिल्ह्यात कमी झाल्यामुळे वैद्यकीय ऑक्सिजनची गरज कमी झाली आहे.

पुणे जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रासाठी २० टक्के ऑक्सिजनच्या वापराला मंजूरी
पुणे जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रासाठी २० टक्के ऑक्सिजनच्या वापराला मंजूरी

By

Published : Jun 3, 2021, 9:07 PM IST

पुणे - कोरोना रुग्णवाढीचा दर जिल्ह्यात कमी झाल्यामुळे वैद्यकीय ऑक्सिजनची गरज कमी झाली आहे. औद्योगिक क्षेत्राची ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन आता औद्योगिक क्षेत्राला २० टक्के ऑक्सिजन वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे.


वैद्यकीय सेवेसाठी ऑक्सिजन मागणी घटली
पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढत असताना 363 मॅट्रिक टन एवढ्या ऑक्सिजनची आवश्यकता लागत होती. आता कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्यामुळे वैद्यकीय वापरासाठी 190 मॅट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची आवश्यकता लागत आहे. जिल्ह्यात दररोज 355 मॅट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन होत आहे. तसेच पुणे विभागाबाहेरील ऑक्सिजनच्या मागणीतही घट झाली आहे. हवेतून ऑक्सिजन काढणाऱ्या विविध प्लॉन्टमधून 20 टक्के ऑक्सिजन मिळत आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात औद्योगिक चक्र सुरु राहावे, यासाठी 20 टक्के ऑक्सिजन औद्योगिक क्षेत्रासाठी देण्याचा निर्णय पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details