पुणे -शहरातील मानाच्या पाच गणपतींची आज उत्साहात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्याचबरोबर, शहरातील प्रसिद्ध गणपती मंडळ आणि लहान मोठ्या मंडळांनी वाजत गाजत मिरवणुका काढून आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत केले. अतिशय उत्साहपुर्ण वातावरणात पुण्यात दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला आज सुरुवात झाली.
पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची जल्लोषात प्राणप्रतिष्ठापना - kasaba ganpati
शहरातील मानाच्या पाच गणपतींची आज उत्साहात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्याचबरोबर, शहरातील प्रसिद्ध गणपती मंडळ आणि लहान मोठ्या मंडळांनी वाजत गाजत मिरवणुका काढून आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत केले.
पुण्यातील प्रसिद्ध 'श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती' मंडळाच्या बाप्पाची जल्लोषात मिरवणूक काढून दुपारी साडेबारा वाजता प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सद्गुरु जंगलीदास महाराज, शिर्डी यांच्या हस्ते या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तर, मानाचा पहिला 'कसबा गणपती'ची प्राणप्रतिष्ठापना सकाळी साडे अकरा वाजता आध्यत्मिक गुरू श्री एम यांच्या हस्ते करण्यात आली. पुण्यातील महत्वाच्या अशा 'भाऊ रंगारी' मंडळाच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते करण्यात आली .भिडे यांनी मिरवणुकीत भाऊ रंगारी गणपती मिरवणूक रथाचे सारथ्यही केले.