पुणे : राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्यावतीने काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र शासनाला इशारा देण्यात आला होता (Resident doctors in Sassoon also join strike ) की त्यांच्या महत्त्वाच्या मूलभूत मागण्या त्वरित मान्य करा अन्यथा ते काम बंद आंदोलन (Resident Doctors Strike) सुरू करणार आहेत. त्यांच्या इशारानंतर अद्यापही शासनाने त्यांच्यासोबत बोलणी केलेली नाही. त्यामुळे आजपासून राज्यातील हजारो निवासी डॉक्टर संपावर गेले आहे. पुण्यात देखील ससून रुग्णालयातील तब्बल 600 मूल निवासी डॉक्टर संपावर गेले असून जो पर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तो पर्यंत अश्याच पद्धतीने बेमुदत बंद असणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
डॉक्टर संघटनेने केला आरोप :राज्यात एकीकडे साथीचे आजार आणि कोरोना विषाणूने थैमान घातले असून आरोग्य व्यवस्थेवर त्याचा ताण पडत आहेत. अशा परिस्थितीत राज्यभरातील हजारो निवासी डॉक्टरांनी आजपासून संपाची हाक दिली आहे.पुण्यात देखील मुख्य असलेल्या ससून रुग्णालयातील 600 मूल निवासी डॉक्टर संपावर गेले असून फक्त ओपीडी असणार आहे. तर अत्यावश्यक सेवेत आम्ही सहभागी होणार असल्याचे आंदोलक डॉक्टरांचे म्हणणे आहे. राज्य सरकारकडे अनेकदा पत्र व्यवहार करुनही मागण्या पूर्ण होत नसल्याने डॉक्टर संघटनेने संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. यात अनेकदा मागणी केली तरी देखील मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप निवासी डॉक्टर संघटनेने केला आहे. त्यामुळे राज्य सरकारचे आपल्या मागण्यांकडे आणि अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी निवासी डॉक्टरांकडून हा संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आज राज्यभर अनेक शहरातील शासकीय रुग्णालय परिसरात निवासी डॉक्टरांकडून निदर्शने केली जात आहे. सर्वसामान्य छोट्या-मोठ्या आजारासाठी सरकारी रुग्णालय हाच एकमेव सामान्य जनतेला आधार आहे. तो देखील कोलमडून जाईल. अशी परिस्थितीती निर्माण झाली आहे. अशातच ससून रुग्णायातील कोणतीही आरोग्य व्यवस्था कोलमडली जाणार नसल्याचे यावेळी ससून रुग्णालयातील डीन विनय काळे यांनी माहिती दिली.