Research Student Hunger Strike पुणे : बार्टीच्या बाहेर अधिछात्रवृतिचे पीएचडी संशोधक विद्यार्थी गेल्या 4 दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण सुरु आहे. या संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे की युजीसी, सारथी, महाज्योती प्रमाणे (BANRF-2018)पीएचडी करणाऱ्या 214 विदयार्थ्याना सलग 5 वर्षे फेलोशिप देण्यात यावी. या मागणीसाठी गेली अनेक दिवस विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार, प्रधानमंत्री सचिव तसेच महासंचालक यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.
संशोधन विद्यार्थ्याचे आमरण बेमुदत उपोषण सातत्याने मागणी सुरु आहे : वारंवार पाठपुरावा देखील अद्याप कोणत्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय देण्यात आला नाही. जोपर्यंत 5 वर्ष फेलोशिप करण्याचा निर्णय सकारात्मक लेखी स्वरूपात किंवा मेल द्वारे कळवण्यात येत नाही, तोपर्यंत उपोषण स्थगित केले जाणार नाही असे उपोषणकर्ते यांनी स्पष्ट सांगितल आहे. या उपोषणाला पाठिंब्यासाठी महाराष्ट्रातून संशोधन विद्यार्थी उपस्थित आहेत. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे सातत्याने मागणी करत आहेत. पण शासन त्याकडे लक्ष देत नाही असे विद्यार्थ्यांचे मत आहे.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनाही निवेदन दिलेली होती: २०२२ च्या नवीन शैक्षणिक धोरनानुसार संशोधनावर अधिक भर देण्यास सांगितले आहे. परंतु, बार्टी संस्थेकडे आम्ही गेले २ वर्ष झाले त्यासंबंधीत बार्टी संस्थेकडे आम्ही गेले दोन वर्ष पाठपुरावा करत आहे. त्यामध्ये निवेदनेही देण्यात आली आहेत. परंतु, त्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे योग्य ते उत्तर आम्हाला दिलेली नाहीत. तरी अजून किती दिवस आम्हाला आंदोलन उपोषण करायला लावणार आहेत हे त्यांनाच माहित आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये आम्ही महाविकास आघाडीचे सरकार होते. तेव्हा, ही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनाही निवेदन दिलेली होती. आत्ताही निवेदन देऊन आंदोलन करून आमच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नाही असेही यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितल आहे.
आमची मागणी नियमात आहे : विद्याथ्र्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत आहे व बार्टी संस्था विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांनी पीएचडीचे काम करत बसावे की संस्थेच्याच मागे लागाव हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने संशोधन करण्यासाठी संस्थेने सहकार्य करावे व योग्य ती माहिती योग्य वेळी द्यावी, ही त्यांना आम्ही वारंवार विनंती करत आहोत. आमची मागणी नियमात असून ही बहुजन समाजात किती दिवस अन्याय होणार आहे हे समजत नाही. त्यामुळे बार्टी प्रशासनाने योग्य ते लक्ष घालून आमचा मार्ग मोकळा करणे गरजेच आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या तरच आम्ही या आमरण उपोषणातून माघार घेऊ, नसेल तर या ठिकाणावरून आम्ही उठणार नाही असे देखील यावेळी या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :लोकशाही भक्कम करायची असेल तर पक्षांतर बंदी कायदा मजबूत करण्याची गरज- उल्हास बापट