पुणे -कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनला एक महिना पूर्ण झाला. महाराष्ट्रात मुंबई शहरा खालोखाल पुणे शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे पुणे शहरात लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करताना पोलिसांनी वेळोवेळी कडक पाऊले देखील उचलली. पुणे शहराचे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी मागील एक महिन्यात करण्यात आलेल्या कारवायांचा आढावा घेतला.
लॉक डाऊनचे उल्लंघन करणाऱ्या 26 हजार पुणेकरावर गुन्हे, तर 32 हजार दुचाकी जप्त - पुणे कोरोना अपडेट
महाराष्ट्रात मुंबई शहरा खालोखाल पुणे शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे पुणे शहरात लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करताना पोलिसांनी वेळोवेळी कडक पाऊले देखील उचलली. पुणे शहराचे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी मागील एक महिन्यात करण्यात आलेल्या कारवायांचा आढावा घेतला.
पुण्यात गेल्या महिन्याभरात लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 26 हजार पुणेकरांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या सर्वांवर कलम 188 अन्वये गुन्हे दाखल झाले आहेत. याच काळात विनाकारण बाहेर फिरणाऱया दुचाकीस्वारावरही मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे. तब्बल 32 हजार दुचाकी पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात जप्त केल्या आहेत.
या महिन्याभराच्या लॉकडाऊन दरम्यान अपवाद वगळता बहुतांश पुणेकरांनी पोलिसांना सहकार्य केले. याबद्दल पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी पुणेकरांचे आभारही मानले. या पुढेही असेच सहकार्य करुन कोरोनाची लढाई जिंकण्याचे आवाहन त्यांनी पुणेकरांना केले. दरम्यान, शुक्रवारी पुण्यातील कन्टेंमेन्ट झोनमधील संचारबंदी काही प्रमाणात सामान्य करण्यात आली आहे.