पुणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुणे मनपाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. अशा कर्मचार्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयाची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. किंवा त्याच्या वारसाला मनपामध्ये नोकरी देऊन 75 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.
... तर मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार एक कोटी रुपयांची आर्थिक मदत - पुणे मनपा
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ
पुणे मनपात साधारण 10 हजार कर्मचारी आणि अधिकारी काम करतात. त्यामुळे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे मनपाने घेतलेला हा निर्णय महत्वाचा आहे.
Last Updated : Apr 9, 2020, 1:20 PM IST