पुणे :फुकट अंडा राईस देण्यास नकार दिलेल्या हात गाडी चालकाला पिस्तुलाच्या धाकाने जिवे मारण्याची धमकी देऊन गल्ल्यातील पैसे घेऊन फरार झालेल्या आरोपीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. (refused to give free egg rice man threaten to kill). त्याच्याकडून पिस्तूल आणि दोन काडतुसे असे जप्त करण्यात आले आहे. बंड्या उर्फ काळुराम प्रशांत थोरवे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात ही घटना घडली आहे. (man threaten to kill with pistol in Swargate). याबाबत स्वारगेट पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला गेला आहे. (Pune crime news).
Pune Crime News : फुकट अंडा राईस दिला नाही म्हणून पठ्ठ्याने काढले पिस्तूल! - पिस्तुलाच्या धाकाने जिवे मारण्याची धमकी
आरोपीने ठेलेवाल्याकडे फुकट अंडा राईसची मागणी केली, मात्र त्याने नकार दिल्याने राग अनावर होऊन आरोपीने त्याला पिस्तुलाच्या धाकाने जीवे मारण्याची धमकी दिली. (refused to give free egg rice man threaten to kill). (man threaten to kill with pistol in Swargate). त्यानंतर तो गल्यातील अडीच हजार रुपये काढून पसार झाला. (Pune crime news).
आरोपी आणि फिर्यादीची तोंड ओळख : फिर्यादीची स्वारगेट भागात हातगाडी आहे. आरोपीने त्याच्याकडे फुकट अंडा राईसची मागणी केली, मात्र त्याने नकार दिल्याने राग अनावर होऊन आरोपीने त्याला पिस्तुलाच्या धाकाने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो गल्यातील अडीच हजार रुपये काढून पसार झाला. आरोपी आणि फिर्यादीची तोंड ओळख आहे. पुण्यातील आरोपी बंड्या हा गुलटेकडी भागात आल्याची माहिती मिळतात स्वागत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत शिंदे उपनिरीक्षक अशोक येवले अमलदार मुकुंद तारू सोमनाथ कांबळे आणि शेख यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.