पुणे -एका मॅट्रिमोनियल वेबसाईटवर ओळख झाल्यानंतर तरुणीला लग्नासाठी मागणी घालून, तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर, लग्न करण्यास नकार देणाऱ्या एका तरुणावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर देवराज प्रधान (वय 31, रा. एच ई फॅक्टरी, रेंजहिल्स, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका 29 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
शारीरिक संबंधानंतर लग्नास नकार, तरुणाविरोधात गुन्हा दाखल - पुणे क्राईम न्यूज
एका मॅट्रिमोनियल वेबसाईटवर ओळख झाल्यानंतर तरुणीला लग्नासाठी मागणी घालून, तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर, लग्न करण्यास नकार देणाऱ्या एका तरुणावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर देवराज प्रधान असे या तरुणाचे नाव आहे.
आरोपीचा लग्न करण्यास नकार
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी तरुण हा केंद्र सरकारच्या एचई कंपनी असिस्टंट लेबर कमिशनर या पदावर कार्यरत आहे. जुलै 2020 मध्ये त्याची फिर्यादी तरुणीसोबत एका मॅट्रिमोनियल वेबसाईटवर ओळख झाली. त्यानंतर आरोपीने फिर्यादी तरुणीला लग्नाची मागणी घातली आणि तिच्याशी ओळख वाढवली. तिचा विश्वास संपादन करून, रेंजहिल्स परिसरातील सरकारी टाईप्स कॉटर्स मध्ये तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर फिर्यादी तरुणीने आरोपीकडे लग्न करण्याची मागणी केली असता, तो टाळाटाळ करू लागला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित तरुणीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. खडकी पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपीची सध्या बदली झाली असून, तो गुजरात राज्यात कार्यरत आहे.अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.