महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातील पावसाने 10 वर्षांचे 'रेकॉर्ड' मोडले

पुणे शहरात संततधार पडणाऱ्या पावसाने जुलैमधील गेल्या 10 वर्षांतील 'रेकॉर्ड' मोडले आहे.

पुण्यातील पावसाने 10 वर्षांचे 'रेकॉर्ड' मोडले

By

Published : Aug 4, 2019, 7:25 PM IST

पुणे- शहरात संततधार पडणाऱ्या पावसाने जुलैमधील गेल्या 10 वर्षांतील 'रेकॉर्ड' मोडले आहे. यापूर्वी 2014 मध्ये 282.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. या वर्षी जुलैच्या 30 दिवसांमध्ये 359.2 मिमी पावसाची नोंद केली असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

आपत्कालीन यंत्रणा सज्ज-

पुणे जिल्यातील पश्चिम भागात सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे खडकवासला, वरसगाव, टेमघर, पानशेत ही 4 धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पुणेकरांना वर्षभराच्या पाण्याची सोय झाली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातून पाणी सोडण्यात येत असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे.

पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणी साठा (टीएमसी मध्ये)
धरण टीएमसी टक्केवारी
पवना 8.34 98.92
मुळशी 17.91 97.05
चासकमान 7.54 99.55
भामा आसखेड 7.61 99.29
भाटघर 21.87 93.07
नीरा देवघर 11.53 98.29
वीर 8. 87 94.26
माणिकडोह 5.02 49.33
येडगाव 1.85 95.28
वडज 0.84 71.64
डिंभे 11.84 94.79
घोड 3.40 66.20
उजनी 19.42 36.25

ABOUT THE AUTHOR

...view details