बारामती -माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात विक्रमी ८०१ बाटल्यांचे संकलन करण्यात आले. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अक्षय ब्लड बँक पुणे, डोर्लेवाडी ग्रामस्थ व सार्वजनिक २० तरुण मंडळांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा -योगराज सिंग पुन्हा चर्चेत...दिग्दर्शकाने केली चित्रपटातून हकालपट्टी
या शिबिराचे उद्घाटन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संतोष झगडे यांच्या हस्ते झाले. यावेळी बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, पुण्याचे उद्योजक दशरथ जाधव, विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, तहसीलदार विजय पाटील, माढाचे तहसीलदार राजेश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे, पंचायत समिती सदस्य राहुल झारगड, बारामती शहर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन निरीक्षक महेश चव्हाण, सरपंच बाळासाहेब सरवदे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.