लोणावळा (पुणे) :महाराष्ट्रातील राजकीय पेचावर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानूसार (supreme court on power struggle maharashtra)पुढचा निर्णय केंद्रीय निवडणुक आयोग (Central Election Commission) घेणार आहे. अशातचं, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas danve) यांंनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली असून, खरी शिवसेना आमचीचं, यश आम्हालाच मिळणार असे ते म्हणाले आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि उद्धव ठाकरेंच नेतृत्व हीच खरी शिवसेना (real shivsena) आहे. आम्हीचं खरे शिवसैनिक आहोत. असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे. ते लोणावळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Ambadas Danve: खरी शिवसेना आमचीचं, यश आम्हालाच मिळणार -अंबादास दानवे - अंबादास दानवे
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात सुप्रीम कोर्टाने (supreme court on power struggle maharashtra) शिंदे गटाला काहीसा दिलासा दिला आहे. आता पुढचा निर्णय केंद्रीय निवडणुक आयोग (Central Election Commission) घेणार आहे. अशातचं, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas danve) यांंनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली असून, खरी शिवसेना आमचीचं, यश आम्हालाच मिळणार असे ते म्हणाले आहेत.
अंबादास दानवे म्हणाले की, जे आमदार-खासदार निवडून आलेले आहेत. त्यांना एमबी फॉर्म हा शिवसेना पक्ष प्रमुखांच्या आदेशाने दिला गेला होता. त्यामुळे खरी शिवसेना हा शब्द वापरण्याची गरज नाही. कारण जी शिवसेना आहे, ती उद्धव ठाकरेंचीच (uddhav thackeray) आहे. त्यामुळं आमच्या अपेक्षेचा भंग झालेला नाही. आम्हाला न्याय मिळेलच.
पुढे ते म्हणाले की, पुढची व्यूहरचना पक्षाचे वरिष्ठ ठरवतील. मला तांत्रिक मुद्दे माहीत नाहीत. जनता ज्यांच्या सोबत असते तीचं शिवसेना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(cm eknath shinde) गटाला (shinde group) तात्पुरत्या यशाचा जल्लोष करायची सवय झाली आहे. कायदेशीर लढाईत खर यश आम्हालाच मिळेल. असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला आहे.