पुणे :महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नेहमी चर्चेत असतात. काल औरंगाबादमधील विद्यापीठातील कार्यक्रमात त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात संतापची लाट उसळली आहे. अशातच पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भगतसिंह कोशारीयांचे धोतर फेडणाऱ्या वर १ लाखांचे बक्षीस ठेवले (controversial statment about shivaji maharaj) आहे.
राज्यपालांनंतर शिवसेनेचा भाजपवर निशाणा :महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपालांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्यावरून शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सम्राट औरंगजेबाला 5 वेळा माफी मागायला आणि पत्र लिहायला सांगितले होते, या विधानावरून शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य सुधांशू त्रिवेदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणास्थान :आनंद दुबे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ऐकून औरंगजेब रात्रभर झोपू शकला नाही. ज्या शिवाजीच्या शूर सैन्याने मुघलांचा पराभव केला, त्याने औरंगजेबाची माफी मागितली असती का? भाजपच्या जाणकार प्रवक्त्यांना इतिहासाची जाण नाही, पंतप्रधानांनी आपल्या आवडत्या प्रवक्त्यांना इतरांना ज्ञान देण्याऐवजी इतिहासाचे पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला असता तर बरे झाले असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रातील एकही मूल सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशवासीयांसाठी आदराचे आणि प्रेरणास्थान आहेत.
राज्यपाल कोश्यारींच्या 'त्या' वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आनंद दुबे क्रांतीचौकात मराठा समाजाचे आंदोलन :राज्यपाल भगतसिंह कोष्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यभर आंदोलन केले जात आहेत. क्रांतीचौक भागात मराठा समाजाने आक्रमक होत आंदोलन केले. राज्यपाल हे मुद्दाम महाराजांचा अवमान करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कोश्यारी यांच्या फोटोला जोडे मारून फोटो जाळण्यात आले. यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलन करत असताना अंबादास दानवे यांच्यासह मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
राज्यपालांच्या विरोधात निदर्शने :महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संभाजीनगर येथे विद्यापीठाच्या कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श झाले आहेत, असे आक्षेपार्य वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे अध्यक्ष महबूब शेख यांनी राज्यातील प्रत्येक तालुक्यात राज्यपालांच्या विरोधात निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. उद्या राष्ट्रवादीकडून राज्यभरात ही निदर्शने करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत सातत्याने अशी वक्तव्य केली जात आहेत. राज्यपालांच्या विरोधात सडके कांदे भरलेली काळी टोपी जाळून त्यांच्या या महाराष्ट्र विरोधी व शिवद्रोही मानसिकतेचा निषेध करण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे.
जनतेची माफी मागावी :राज्यपाल आणि जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. त्यांनी केलेल्या या अपमानाबाबत भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांच्याकडून करण्यात आली आहे. राज्यपाल आणि भाजपच्या प्रवक्त्यांनी महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नये, त्यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध महेश तपासे यांनी केला आहे.
संघटना आक्रमक :काल औरंगाबादमध्ये राज्यपाल आणि छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहेत. आता नवे आदर्श गडकरी आणि शरद पवार हे तुमच्यासमोर बसले आहेत. असे विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात वक्तव्य केले होते. त्या विरोधात आता संभाजी ब्रिगेड अनेक संघटना आक्रमक झाल्या असताना पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सुद्धा बक्षीस जाहीर करण्यात आलेले (Reactions on Governor controversial statment) आहे.
राज्यपाल भगतसिंह कोष्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून औरंगाबादमध्ये आंदोलन राज्यपालांच्या वक्तव्यावरचा वाद :उचलत्या वयात धोत्रात घाण करण्यासारखे विषारी वक्तव्य करणाऱ्या राज्यपालाचा जाहीर निषेध, असे या बॅनरवर लिहिण्यात आलेले (Reactions of political leaders on Governor) आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारीचे धोतर पडणाऱ्या रुपये एक लाख रुपयाचे रोख रक्कम बक्षीस देण्यात येईल, असे राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांनी घोषित केलेले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या मुख्य पाच चौकामध्ये असे बॅनर लावून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हे बक्षीस जाहीर केलेले आहे. त्यामुळे राज्यपालांच्या वक्तव्यावरचा वाद आता चांगला चिघळताना दिसत (NCP Banner In Pune) आहे.
प्रतिक्रिया देताना संदीप शशिकांत काळे भगतसिंह कोश्यारी यांचे बॅनर जाळण्याचा प्रयत्न - भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाच्या निषेधार्थ पुण्यात आज युवक काँग्रेस आक्रमक होत लाल महालाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचं बॅनर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अवमान करत आहे.राज्यपाल यांनी जर माफी नाही मागितली तर आम्ही त्यांची येणाऱ्या काळात राजभवनावर जाऊन धोथर फेडून निषेध करू, असा इशारा यावेळी युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे यांनी दिला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वादग्रस्त वक्तव्याविरोधात आंदोलन
राज्यपाल हटाव मागणी - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सातत्याने महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन आहे की त्यांनी राज्यपाल यांना आता हटवावे, अशी मागणी करत आज पतीत पवन संघटनेच्या वतीने लाल महाल येथे आंदोलन करण्यात आला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वादग्रस्त वक्तव्याविरोधात आंदोलन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वादग्रस्त वक्तव्याविरोधात आंदोलन भगतसिंग कोशारी यांच्या फोटोला जोडे मारत केला निषेध - बीडच्या माजलगावमध्ये संभाजी ब्रिगेड वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. राज्याचे राज्यपाल अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्यावरून सतत चर्चेत राहतात मात्र हे त्यांना शोभत नाही त्याचबरोबर ते असे वादग्रस्त केल्याने सर्वसामान्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत त्यांनी असं वक्तव्य करणे त्यांना अशोभनीय असताना सुद्धा राज्याचे राज्यपाल या नात्याने त्यांनी अशा व आपल्या वक्तव्याला आळा घातला पाहिजे त्याचबरोबर आपण एका राज्याचे जिम्मेदार नागरिक आहोत अशा पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे मात्र एकीकडे वादग्रस्त वक्तव्य करून सतत चर्चेत राहणारे राज्यपाल यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करून संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे.