पुणे - राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचे बारावीच्या विद्यार्थी तसेच पालकांनी स्वागत केले आहे. सरकारने परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, निकालाबाबत शासन काय निकष लावणार आहे. पुढच्या प्रवेश प्रक्रियांचे काय याबाबत भूमिका राज्य सरकारने स्पष्ट करावी, अशी या विद्यार्थ्यांनी केली आहे.
विद्यार्थी आणि पालकांच्या प्रतिक्रिया निर्णयाचे विद्यार्थी आणि पालकांकडून स्वागत -
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर 12 वीच्या परिक्षांबाबत काय याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता केंद्राने सीबीएसईची 12 वीची परीक्षा रद्द करण्याच निर्णय घेतल्यानंतर राज्यातही 12 बोर्डाची ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाचे विद्यार्थ्यांसह पालकांनीही स्वागत केले आहे. बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्यच आहे. पण निकाल लावताना काय निकष लावावे, हेदेखील सरकारने जाहीर करावे, अशी मागणीदेखील विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा - अखेर गोवा बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द, असा जाहीर केला जाईल निकाल