महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Reaction of Aghadi MLAs on Kasba ByPoll : कसबा पोटनिवडणुकीवर आमदार रोहित पवार, धीरज देशमुख आणि वरुण सरदेसाई यांची प्रतिक्रिया - या ठिकाणी महाविकास आघडीची मोठी ताकद

पुण्यातील कसबा निवडणूक अत्यंत हायव्होल्टेज बनली आहे. यामध्ये राज्यपातळीवरील मोठ मोठे नेत्यांनी सहभाग घेतल्याने ही प्रतिष्ठेची निवडणूक झाली आहे. यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी सरळसरळ लढत दिसून आली आहे. आता महाविकास आघाडीचे तरुण आमदारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी आमचाच उमेदवार विजयी होणार असा विश्वास प्रगट केला आहे.

Reaction of Aghadi MLAs on Kasba ByPoll
कसबा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ मोटारसायकल रॅली

By

Published : Feb 17, 2023, 8:05 PM IST

कसबा पोटनिवडणुकीवर आमदार रोहित पवार, धीरज देशमुख आणि वरुण सरदेसाई यांची प्रतिक्रिया

पुणे : नुकतेच शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना यश मिळाले आहे. राज्यात ज्या पद्धतीने सत्ता संघर्ष झाला आहे ते लोकांना न पटणारे आहे. हे यातून लोकांनी दाखवून दिले आहे. आतादेखील जनता या दोन्ही पोटनिवडणुकीच्या माध्यमातून दाखवून देणार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार आणि काँग्रसचे आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ मोटारसायकल रॅली :कसबा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत आमदार विश्वजित कदम, आमदार रोहित पवार, आमदार धीरज देशमुख आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते.

कसबा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ मोटारसायकल रॅली

या मार्गाने जाणार रॅली : या रॅलीला कसबा गणपती येथून सुरुवात होऊन पवळे चौक- माया बेकरी चौक- दारुवाला पूल चौक- दूध भट्टी- डुल्या मारुती- चाचा हलवाई - हिंदमाता चौक- पालखी विठोबा चौक- गोविंद हलवाई चौक- डावीकडे कस्तुरी चौक- मिठगंज पोलीस चौकी- सरळ मक्का मशिद (मोमीनपुरा)- घोरपडी पेठ पोलीस चौकी- आर्य सोमवंशी मंगल कार्यालय समाप्त झाली.

कसबा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ मोटारसायकल रॅली

रोहित पवार यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास :यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले की मी बाईक रॅलीच्या अगोदरच या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि या कसबा मतदार संघातील सर्वसामान्य नागरिक यांना विचारपूस केला असता ते सर्व नागरिक हे रवींद्र धंगेकर म्हणजेच महाविकास आघाडी च्या उमेदवारासोबत आहे.कारण भाजप आपल्या स्वार्थासाठी त्यांच्या नेत्यांचा वापर करत आहे.आजारपणात पण आमदार मुक्ता टिळक यांनी पक्षाला गरज असताना साथ दिली.पण जेव्हा त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची वेळ आली तेव्हा पक्षाने वेगळच समीकरण समोर आणलं.तसच खासदार गिरीश बापट यांच्या बाबतीत देखील अश्याच पद्धतीने करण्यात आलं आणि त्यांना आजारपणात प्रचारात सहभागी करून घेण्यात आलं, अशी टीका यावेळी पवार यांनी केली.

रोहित पवारांची फडणवीसांवर टीका :पहाटेच्या शपथ विधीबाबत रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, फडणवीस जे आज बोलत आहेत ते स्वतः बोलत आहे. ते सिंपथी घेण्याचं काम करत आहे.लोक हे ऐकून कंटाळले आहे.त्यांनी आत्ता राज्याच्या हिताचं बोलावं अस देखील यावेळी पवार म्हणाले. यावेळी आमदार धीरज देशमुख म्हणाले की जनतेने जो कौल शिक्षण आणि पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.तसच कौल या दोन्ही पोटनिवडणूक जनता आम्हाला देणार आहे.आणि याचीच भीती मनात असल्याने आज भाजपचे सर्व नेते मंडळी कसबा मतदार संघात तळ ठोकून आहे.आणि अस असल तरी आमचाच उमेदवार हा विजयी होणार असल्याचं यावेळी विश्वास धीरज देशमुख याने व्यक्त केला आहे.

या ठिकाणी महाविकास आघडीची मोठी ताकद :यावेळी वरून सरदेसाई म्हणाले की महाविकास आघडीची किती मोठी ताकद याठिकाणी कसबा आणि चिंचवड मतदार संघात दिसत आहे.युवक हे उस्पूर्त पद्धतीने या बाईक रॅलीत सहभागी झाले आहे.आणि दोन्ही ठिकाणी आमचेच उमेदवार हे जिंकून येणार आहे.अस देखील यावेळी देसाई म्हणाले. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर म्हणाले की आज जनता माझ्या पाठीमागे उभी आहे.आणि ही निवडणूक मीच जिंकणार आहे.आज सकाळीच मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली त्यांनी देखील मला भेटीत सांगितले की हेच योग्य वेळ आहे आणि माझा संपूर्ण पाठिंबा दिला असून ही निवडणूक तुला जिंकायची आहे असा आशीर्वाद त्यांनी मला दिला आहे त्यामुळे माझा आत्मविश्वास अजून वाढला असल्यास धंगेकर म्हणाले.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंच्या हातून गेली शिवसेना; पक्षाचे नाव-चिन्ह धणुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे

ABOUT THE AUTHOR

...view details