रविंद्र धंगेकर यांनी दिली मुक्ता टिळक यांच्या घरी भेट पुणे :आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ मतदार संघात पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रयत्न देखील केले होते. पण त्याला महािकास आघाडीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. महविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर रिंगणात उतरल्याने कसब्याची ही निवडणूक अधिक रंगणार आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. चिंचवडमधून भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर येथे राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देणार हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे.
नाना पटोले यांचा फोन : काल रात्री उशिरा मला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन केला. फोनद्वारे त्यांनी सकाळी उमेदवारी अर्ज भरायचा असे सांगितले. त्यानुसार मी तयारी केली. आज लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्याशिवाय आमदार मुक्ता टिळक यांच्या घरी भेट द्यायला आलो असे यावेळी रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. रोहित टिळक हे देखील रविंद्र धनगरी यांच्याबरोबर उपस्थित होते.
निवडणूक लढवण्यावर रोहित टिळक यांची प्रतिक्रीया :घरात दुःखद घटना घडल्यानंतर मी निवडणूक लढवायची नाही असे ठरवले होते असे रोहित टिळक यांनी सांगितले. पक्षश्रेष्ठींनी मला पोटनिवडणुकीबद्दल विचारले होते. पण मी अलिप्त राहिलो. आज देशभरात ब्राह्मण समाजाच्यावतीने भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला जात आहे. पण आपण पुण्यातील आठही मतदारसंघ बघितले तर कोणत्याही ब्राह्मण समाजाला उमेदवारी दिलेली नाही. तसेच कसबा निवडणुकीबाबत जेव्हा उमेदवार जाहीर झाला, तेव्हा असे वाटले होते की आमच्याच कुटुंबातील लोकांना उमेदवारी दिली जाईल. पण हेमंत रासने यांना जेव्हा उमेदवारी देण्यात आली. तेव्हा तो निर्णय खूपच धक्कादायक होता. ब्राह्मण समाजामध्ये याबद्दल नाराजी असून ती मतदानाच्या माध्यमातून बाहेर येईल. असे यावेळी रोहित टिळक यांनी सांगितले.
कोण आहेत रविंद्र धंगेकर :मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून रविंद्र धंगेकर यांची ओळख होती. मनसेमध्ये असताना त्यांनी अनेक पदावर कामे केली आहेत. शिवसेनेमध्ये दहा वर्षे आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून दहा वर्षे त्यांनी नगरसेवक म्हणून महापालिकेत काम पाहिले आहे. जानेवारी २०१७ मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कसब्यामध्ये अनेक विकासकामे केली आहेत. खासदार गिरीश बापट यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची पुणे शहरात ओळख आहे. विधानसभा निवडणूकांमध्ये धंगेकर यांनी बापटांसमोर कडवे आव्हान उभे केले होते. धंगेकर यांनी २००९ साली विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यांचा अवघ्या ७ हजार मतांनी पराभव झाला होता. त्यांनी बापटांना चांगली लढत दिली होती. २०१४च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीची राज्यात लाट असताना देखील धंगेकर यांनी आव्हान दिले होते.
हेही वाचा :Pimpri Chinchwad By Election: शिवसेनेच्या निर्णयानंतर भूमिका करणार स्पष्ट करू, वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली भूमिका