पुणेPune Woman Police Constable story : आजही समाजात स्त्री पुरुष समानतेचे धडे हे दिले जातात. पुणे शहराला तर मोठा ऐतिहासिक इतिहास आहे. परंतु याच पुण्यनगरीमध्ये सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या हक्कासाठी लढा दिला. परंतु आजही महिलांना आपल्या हक्कासाठी लढावं लागत आहे. त्यांना संघर्ष देखील करावं लागत आहे. अश्यातच पुण्यातील पोलीस खात्यात असणाऱ्या एका महिला कॉन्स्टेबलला आपल्या 9 महिन्याच्या बाळाला सोबत घेऊन कर्तव्य करावं लागतंय. तसेच वरिष्ठांकडून त्रास होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
हातात लहान बाळ घेऊन बजावते ती कर्तव्य: आज पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग बाहेर शिक्षकांचा मोर्चा होता. या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी लष्कर पोलीस स्टेशनच्या महिला कॉन्स्टेबलला ड्युटी लावण्यात आली. हातात लहान बाळ घेऊन ही महिला कॉन्स्टेबल आपलं कर्तव्य बजावत होती. कर्तव्य बजावत असताना लहान मुलगा रडत होता. सेंट्रल बिल्डिंग येथे आपल्या कामानिमित्त आलेले आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) त्या ठिकाणी आले. त्यांनी या महिला कॉन्स्टेबलची विचारपूस केली. त्यावेळी महिला कॉन्स्टेबलने वरिष्ठ त्रास देत आहेत. लहान बाळ असतानाही बंदोबस्ताच्या ड्युटी लावत असल्याचं सांगितलं. त्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांना फोन लावून याबाबत विचारणा केली.