पुणे : कसबा पोट निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असताना, नाराज इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. तरी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर यांनी काँग्रेसमधून बंड पुकारला आणि आज उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता ही लढत तिरंगी होणार, असे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मीच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
30 वर्षापासून मी कसबा मतदारसंघात काम करतोय :गेल्या 30 वर्षापासून मी कसबा मतदारसंघात काम करत असून कसबा मतदार संघाची कामे मला माहित आहे. या मतदारसंघात पूर्वी 3 लाख मतदार होते.आत्ता अडीच लाख मतदार राहिले आहे. जे मतदार होते ये इथ कामे न झाल्याने स्थलांतरित झाले आहे. त्या लोकांना इथ परत आणायचं आहे. या मतदारसंघातील वाहतूककोंडी, जुने वाडे तसेच स्थानिक लोकांचे प्रश्न हे महत्त्वाचे असून, ते मी येणाऱ्या काळात सोडवणार आहे, असेदेखील यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले.